शिल्पा मित्तल बनल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१९
रष्मी काटकर यांनी पटकावला मिस इंडिया युनिव्हर्स २०१९ चा किताब
स्वाती सराफ ठरल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स क्लासिक २०१९ च्या मानकरी
पुणे २३ डिसेंबर २०१९- पुण्यामध्ये नुकतीच मिस आणि मिसेस इंडिया युनिव्हर्स हि स्पर्धा पार पडली.यात संपुर्ण भारतातील स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यामध्ये उंची, व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गूण हे निकष लक्षात घेऊन परिक्षकांनी अतिंम निवड केली.
अत्यंत कठीण निवड प्रक्रियेनंतर शिल्पा मित्तल या मिसेस इंडिया युनिव्हर्स बनल्या आणि रष्मी काटकर यांनी मिस इंडिया युनिव्हर्स २०१९ चा किताब पटकावला , याचबरोबर स्वाती सराफ मिसेस इंडिया युनिव्हर्स क्लासिक २०१९ च्या मानकरी ठरल्या. ही माहिती देण्यासाठी आज पत्रकार संघामध्ये एका पत्रकार सम्मेलानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वाती सराफ ( मिसेस इंडिया युनिव्हर्स क्लासिक २०१९) आपले विचार व्यक्त करताना म्हणाल्या कि " "मी खरोखरच आनंदी आहे की हे स्वप्न सत्यात उतरले आहे, माझे पालक, मित्र आणि शुभचिंतकांच्या प्रेम आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते. आम्हा सगळ्यांना हा उत्तम प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आयोजकांची खरोखरच ऋणी आहे" जॅझमाटाझ मागील अनेक वर्षांपासून या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे