​​ *३१ डिसेंबर रोजी  रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी 1 हजार  शुभेच्छा पत्र आणि चॉकोलेट  वाटप*

 


​​ *३१ डिसेंबर रोजी  रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी 1 हजार  शुभेच्छा पत्र आणि चॉकोलेट  वाटप*
---
*भारती विद्यापीठ ' इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट ' (आय.एम.ई.डी.) चा पुढाकार*


पुणे: 


सरत्या वर्षाला निरोप देवून नव्या वर्षाचे स्वागत करण्याच्या 31 डिसेंबर दिवशी भारती विद्यापीठ 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट' (आय.एम.ई.डी.) च्या  वतीने 'रस्ता सुरक्षा जनजागृती अभियाना'चे आयोजन करण्यात आले आहे. 


या अभियानातंर्गत पुणे शहरातील विविध भागातील प्रमुख 16 सिग्नलच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थ नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि वाहतुक सुरक्षा विषयी संदेश असलेल्या १ हजार शुभेच्छा पत्रांचे आणि चॉकलेटचे वाटप करणार आहेत.


या अभियानाचा शुभारंभ  सकाळी सव्वा नऊ वाजता अलका टॉकीज चौक येथे होणार आहे.  डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक ) यांनी हि माहिती दिली. तसेच महाविद्यालयाचे व्यवस्थापनशास्त्र तसेच एनएसएस विभागाचे विद्यार्थी आणि आयएमईडीमधील प्राध्यापक सहभागी होणार आहेत.



या अभियानातंर्गत वाटण्यात येणारे 'पॉकेट शुभेच्छा पत्र' चार पानी आहे, यामध्ये वाहतूक सुरक्षा याविषयी संदेश देण्यात आले आहेत. 


'रस्ते अपघातांची समस्या दिवसेंदिवस भेडसावत आहे, ३१ डिसेंबर च्या  पार्श्‍वभूमीवर हे जनजागृतीपर अभियान राबविण्यात येत आहे', अशी माहिती डॉ.सचिन वेर्णेकर यांनी दिली.


हे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान शहरातील प्रमुख चौकांमध्ये  आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये कोथरूड , परिहार चौक (औंध), स्वारगेट, अलका टॉकीज चौक, बावधन, कात्रज, अभिरुची मॉल,सिंहगड रोड, शिवाजीनगर, नळ स्टॉप या चौकांचा समावेश आहे.



................................................