मा. नामदेवराव (बापू)भालशंकर गौरव समिती, सोलापूर आणि मा .रुक्मिणी फौंडेशन, सोलापूर यांच्यावतीने मा नामदेवराव (बापू)भालशंकर यांच्या 81व्या वाढदिवसानिमित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आणि अनाथ, निराधार, गरजू, हुशार, होतकरु विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षा देणारे गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण समारंभ शिवस्मारक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.आ. दत्तात्रय सावंत, शिक्षण अधिकारी मा. सुलभा वठारे, उस्मानाबाद जि प चे समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले,माजी शिक्षण अधिकारी शिवाजीराव चंदनशिवे,शिक्षण विस्तार अधिकारी मा अशोक भांजे, इत्यादी मान्यवरांचे शुभ हस्ते पुरस्कार वितरण संपन्न झाले. तसेच शिष्यवृत्ती धनादेश वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळी मातोश्री रुक्मिणी नामदेवराव भालशंकरआणि प्राचार्य आशुतोष शहा यांची विशेष उपस्थिती होती.बोधीप्रकाश गायकवाड, बाळासाहेब डोळसे, संग्राम कांबळे, विजयकुमार लोंढे, रमेश लोखंडे, सुनिल सन्मुख, संजय शिवशरण, मिलिंद भालशंकर, राजेंद्र सोरटे, सुशिलचंद्र भालशंकर,इत्यादीनी विशेष परिश्रम घेतले.आयु. सुभानजी बनसोडे, डॉ जयंत करंदीकर, पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव, सोलापूर आकाशवाणीचे निवेदक नितीन बनसोडे,दै सकाळचे पत्रकार संतोष सिरसाट, विनोद वर, राणी तोडकरी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे शेकडो पदाधिकारी, सभासद, सदसंकल्प शिक्षण समुहातील मुख्यअध्यापक, शिक्षक व कर्मचारी, नातेवाईक, मित्रमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मा नामदेवराव (बापू)भालशंकर यांच्या 81व्या वाढदिवसानिमित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा