*शिक्षण संचालक व उपसंचालक कार्यालयातील अधिकारी - कर्मचार्यांच्या (टोळी) निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदली करा...* - संभाजी ब्रिगेड
▪️ *भ्रष्टाचारी उपसंचालक प्रविण अहिरे यांचे निलंबन करा...*
शिक्षण आयुक्त, माध्यमिक शिक्षण संचालक व प्राथमिक शिक्षण संचालक, उपसंचालक हा विभाग व त्यांचे कार्यालय हे राज्याचा महत्त्वाचा घटक आहेत. राज्याच्या जडणघडणीत या शिक्षण विभागाचा सर्वात मोठा वाटा आहे. *'शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिणार प्रयोग उरणार आहे...'* हे जरी सत्य असले तरी या कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा प्रचंड भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. सर्वसामान्य व्यक्ती शिक्षक व संस्थाचालक यांच्यावर प्रशासन गुरगुर करत आहे बरेच अधिकारी व कर्मचारी अनेक वर्षांपासून (६ वर्षाच्यावर) एका कार्यालयात त्यात त्याच टेबल वर नोकरी करत असल्याने प्रचंड मनमानी करत आहेत. कार्यालयातील काही लोकांचे फक्त टेबल बदलले जातात मात्र या लोकांची जिल्ह्याबाहेर बदली होत नाही. सहा वर्षाच्या नंतर जिल्ह्याच्या बाहेर बदली झाली पाहिजे. शासकीय नियम व यंत्रणेचा गैरवापर होत आहे. अधिकाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करावे याबाबत आम्ही मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्याकडे ही तक्रार करणार आहोत... अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली.
प्रा. शिक्षण संचालक, मा. शिक्षण संचालक, व सर्व उपसंचालक सरावर अनेक विषयावर वेगवेगळी निवेदने तक्रारी अथवा अडचणीचे कामे संदर्भात निवेदन दिलेली असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक संचालक, उपसंचालक यांच्याकडे कामासाठी येत असतात. परंतु कोणत्याही व्यक्तीची कामे वेळेत केली जात नाहीत. वारंवार उडवाउडवीची उत्तरे कार्यालयात बसणारे अधिकार्यांकडून दिली जातात. अधिकारी व कर्मचाऱ्यांची या शिक्षण विभागात हप्तेखोर (टोळी) निर्माण झालेली असून... *हात ओले केल्याशिवाय कामे केली जात नाहीत.* (उदा. प्रविण अहिरे उपसंचालक पुणे विभाग यांच्याकडे संस्थेची (शाळा) मान्यते संदर्भात मागणी केली. असता त्यांना पैशाची मागणी करण्यात आली. या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. परंतु त्यांच्यावर कुठलीही निलंबनाची वा इतर कठोर कारवाई केलेली नाही.) बऱ्याच अधिकार्यांची मोनोपोली झालेली आहे. ती मोडीत काढली पाहिजे. तसेच मा. आयुक्त आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे यांचे तीन वर्ष एका ठिकाणी सेवा केली असेल तर शासकीय नियमानुसार *(६ वर्षाच्यावर) सर्वांचे पुणे जिल्हा बाहेर बदल्या कराव्यात...* अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी आहे.
सर्व शासकीय नियमानुसार बदलीस पात्र असणाऱ्या लोकांच्या तात्काळ बदल्या झाल्या पाहिजेत. संचालक, उपसंचालक कार्यालयात मनमानी करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करून भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे निलंबन झाले पाहिजे... आपल्या कार्यालयात प्रत्येक कामासाठी पैशाची मागणी केली जाते. त्या लोकांना वारंवार चकरा मारायला भाग पाडले जाते बऱ्याच अधिकार्यांची व कर्मचार्यांची संभाजी ब्रिगेड कडे लेखी तक्रार आहे. कृपया वरील मागणीचा तात्काळ विचार करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कठोर कारवाई करावी... अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
आज वरील विषयाबाबत पत्रकार भवन पुणे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी...
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, गणेश निळ, हरी शिंदे, नितीन भोसले, पुणे जिल्हा सचिव महादेव मातेरे, राहूल टेंगळे, प्रशांत धुमाळ, संदीप लहाने पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.