हातिलचे पुण्यात विशेष दालन, पश्चिम भारतातील पहिले पाऊल
पुणे २८ डिसेंबर, २०१९- होम लाइफ स्टाईल डेस्टिनेशन असलेल्या क्रिएटीसिटी येथे आज हातिल या नवीन दालनाचा भव्य शुभारंभ झाला.. हातिल हि बांग्लादेश मधील फर्निचर बनविणारी
एक विख्यात कंपनी आहे जी हॉटेल्स आणि गृहप्रकल्पांसाठी फर्निचर डिजाइन करते .पुण्यातील या दालनाचे उदघाटन सेलीम रेहमान (सीएमडी हातिल) , यांच्या हस्ते पार
पडले. यावेळी आतिफ दीवान रशीद (ग्लोबल बिझिनेस अॅडव्हायझर हातिल), वरुण जिंदल, अजय यादव आणि अॅव्हन गोयल (क्राटोस फर्निशर्स प्रा.लि.चे संचालक व हातिलचे भारतीय पार्टनर) आणि
क्रिएटिसिटीचे सीईओ महेश आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
हातीलच्या निर्यात क्षेत्रांमध्येभारत, यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सौदी अरेबिया, कुवैत, युएई, थायलंड, इजिप्त, रशिया इत्यादींचा समावेश आहे. हातिल यू व्ही लॅकर टेक्नॉलजीपासुन बनले आहे पर्यावरणपुरक आणि फॉर्मलडीहाइड व घातक पदार्थांपासून मुक्त आहे. दक्षिण आशियात सध्या हातिलचा लाकडाचे काम करणारा सर्वात मोठा कारखाना आहे जो 800000 चौरस फुट आहे.
हातिलचे सीएमडी सेलीम रेहमान यावेळी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले , आम्हाला आनंद होत आहे कि आम्ही पुण्यामध्ये क्रिएटीसिटी येथे दालन घेऊन आलो आहोत . पुणे ही आमच्यासाठी महत्वाची बाजारपेठ आहे. भारतीय रोगण वापरुन बनविण्यात आलेले उचित आकाराचे आणि आधुनिक फर्निचर बांग्लादेश आणि इतर बाजारपेठांमध्ये प्रचंड यशस्वी झाले आहे. आम्ही जर्मन आणि इटालियन मल्टिपल ऑपरेशन मशीनमध्ये 250 कोटींपेक्षा जास्त नवीन गुंतवणूक करून आपली क्षमता वाढवण्याच्या प्रक्रियेत आहोत आणि आमच्याकडे एकूण 92 शोरूम आणि 5,70,000 चौरस फूट सिंगल-ब्रँड रिटेल फ्लोर आहेत , जे की भारत आणि विदेशात आहेत.
यावेळी बोलताना वरुण जिंदाल, संचालक क्राटोस फर्निशर्स प्रा. लिमिटेड (भारतीय पार्टनर) म्हणाले, “हातीलने २ वर्षापूर्वी झिक्रापूर (चंदीगड) मध्ये आपले पहिले स्टोअर उघडले होते आणि थोड्याच अवधीत भारतभरातील जवळपास २० ठिकाणी आपल्या सेवेचा विस्तार केला .आज आम्ही योग्य मार्गावर राहुन आमची ब्रँड व्हॅल्यू वाढवत आहोत.
पुणे सर्वांसाठी नेहमीच स्वागतार्ह शहर राहिले आहे, जिथे लोक येतात आणि त्यांच्या आकांक्षा साध्य करतात, आमचा विश्वास आहे की लोकांची जीवनशैली वाढण्यास आणि त्यांची उन्नती करण्यास
मदत करण्याच्या या भावनेने हातिल नेहमिच सक्रिय राहील.