*डोळ्यावर काली पट्टी बांधत (गांधारी प्रतिकात्मक)* *आंदोलन* पुनवर्सन जमीन गैरव्यवहार प्रकरण कारवाई न केल्याबद्दल प्रशासनाचा केला निषेध पुणे दि ---- शिरुर तालुक्यातील शेकडो एकर जमीन वाटपाबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत छावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याकडून आज जिल्हाधिकारी डोळ्यावर काली पट्टी बांधत गांधारी प्रतिकात्मक आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला .*प्रशासन सर्व दिसत असून ही आंधळ्याची भूमिका घेत असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्याकडून आरोप करण्यात आले* .शिरूर तालुक्यातील पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या जमिनी बेकायदेशीर वाटप झाल्याचा गंभीर आरोप या संघटनेने केला आहे. गेल्या वर्षभरापासून ही संघटना या कारभाराची चौकशीची मागणी करीत असून ,याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आज छावा प्रतिष्ठानने डोळ्यावर काली पट्टी बांधत जिल्हा प्रशासणाचा निषेध करण्यात आला .यावेळी छावा प्रतिष्ठानचे तेजस यादव म्हणाले की ,या जमीन वाटपाबाबत अटी, नियम आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते .एकीकडे शेतकरी अडचणीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही त्यातच पुनवर्सनाच्या जमीणी बेकायदा लाट नाऱ्या नां आणि यामध्ये सहभागी असणाऱ्याअधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले . या आंदोलनात पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या आंदोलनाचे नेतृत्त्व छावा प्रतिष्ठानचे प्रमुख तेजस यादव यांनी केले .यावेळी स्वप्नील दरेगावकर सह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

*डोळ्यावर काली पट्टी बांधत (गांधारी प्रतिकात्मक)* *आंदोलन*



पुनवर्सन जमीन गैरव्यवहार प्रकरण 
कारवाई न केल्याबद्दल प्रशासनाचा केला निषेध 
पुणे दि ---- शिरुर तालुक्यातील शेकडो  एकर जमीन वाटपाबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत  छावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याकडून  आज जिल्हाधिकारी डोळ्यावर काली पट्टी बांधत गांधारी प्रतिकात्मक  आंदोलन करीत प्रशासनाचा निषेध केला .*प्रशासन सर्व दिसत असून ही आंधळ्याची भूमिका घेत असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्याकडून आरोप करण्यात आले* .शिरूर तालुक्यातील पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या जमिनी बेकायदेशीर वाटप झाल्याचा गंभीर आरोप या संघटनेने केला आहे.  गेल्या वर्षभरापासून ही संघटना या कारभाराची चौकशीची मागणी करीत असून ,याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत आज छावा प्रतिष्ठानने डोळ्यावर काली पट्टी बांधत जिल्हा प्रशासणाचा निषेध करण्यात आला .यावेळी छावा प्रतिष्ठानचे तेजस यादव म्हणाले की ,या जमीन वाटपाबाबत अटी, नियम आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते .एकीकडे शेतकरी अडचणीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही त्यातच पुनवर्सनाच्या जमीणी बेकायदा लाट नाऱ्या नां आणि यामध्ये सहभागी असणाऱ्याअधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले .
             या आंदोलनात पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .या आंदोलनाचे नेतृत्त्व छावा प्रतिष्ठानचे प्रमुख तेजस यादव यांनी केले .यावेळी स्वप्नील दरेगावकर सह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.