मसाल्याने ठासून भरलेला मराठी 'दंडम' २७ डिसेंबरला सिनेमागृहांत

मसाल्याने ठासून भरलेला मराठी 'दंडम' २७ डिसेंबरला सिनेमागृहांत

धडाकेबाज डायलॉग, नजर खिळवून ठेवणारी जांबाज ॲक्शन, दिलखेचक स्पेशल गाणी अश्या मसाल्याने ठासून भरलेले साऊथ इंडियन सिनेमे कुणाला नाही आवडत? निखळ मनोरंजनाची परिपूर्ण असलेले हे सिनेमे बघण्याची खरी मजा मात्र ओरिजिनल सिनेमा पाहतानाच येते. पण पुन्हा भाषेचा अडसर येतोच. पण आता मराठी रसिकांना अश्या मनोरंजनासाठी इतर भाषेत सिनेमे पाहायची गरजच नाही. कारण आता मराठी रसिक प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय, 'व्ही सत्तू' दिग्दर्शित मराठी चित्रपट 'दंडम'. हा चित्रपट मराठी रसिकांची खास गरज ओळखूनच बनवला असल्याने यात मनोरंजनाचा भरपूर मसाला आहे. यात आहे उत्तम कथानक, मनावर गारुड करणारी गाणी आणि दमदार ॲक्शन आणि बरच काही.

आता यानंतर सहज पडणारा प्रश्न कि एवढ्या दमदार सिनेमात स्टारकास्ट तरी कुठली आहे. तर यात नेहमीच्या चेहऱ्यांना वगळून नव्या फ्रेश चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एंट्रीलाच काळजाला हात घालणारा डॅशिंग मयूर राऊत, तसच रिपुंजय  लष्करे, याबरोबरच शरीर सौष्ठवाच्या मैदानातला बादशहा मी. युनिव्हर्स संग्राम चौगुले हे दमदार त्रिकुट तर आहेच पण त्याच जोडीला खलनायक सुद्धा तितक्याच प्रतिभेने साकारणारे अक्षय जांभळे, संतोष वारे हे देखील प्रेखसकांची मन जिंकतील यात काही शंका  नाही. आपल्या दिलखेचक अदांनी  घायाळ करणारी रिद्धी कुमार ह्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.  ह्या प्रमुख भूमिकांबरोबरच लहान पण लक्षवेधी भूमिका साकारणारे अनेक कलाकार रसिकांच्या मनात खास जागा करतील.

असा आशयघन ॲक्शनपट " दंडम " प्रेक्षकांच्या दिमतीला येतोय २७ डिसेंबरला आपल्याच जवळच्या सिनेमागृहात. पण  एवढा वेळ थांबावे लागणार म्हणून लगेच निराश होऊ नका. युट्युब वर तुफान प्रसिद्ध झालेला आणि प्रेक्षकांनी वाखाणलेला ट्रेलर तोपर्यंत नक्कीच पहा.

हे सगळे स्वप्न सत्यात उतरवणारे स्टार दिग्दर्शक व्ही. सत्तू या निमित्ताने बोलताना म्हणाले कि. "मराठी सिनेमा जर साऊथ च्या तोडीस तोड बनवायचा असेल तर तितक्याच ताकदीची ऍक्शन , दमदार हिरो त्याला टक्कर देऊ शकेल असा व्हिलन हे सगळं पाहिजे". "सर्व नवे कलाकार घेऊन चित्रपट बनविण्याचा प्रवास खडतर तर होताच पण तितकाच आनंददायीही होता". "या सिनेमात सिक्स पॅक असलेला फक्त हिरोच नाही तर सहकलाकारांचेही कमावलेले शरीर प्रेक्षकांना पाहता येणार आहे". "हा नुसता ऍक्शन पट नसून एक आशयघन आणि मनोरंजन भरलेला एक परिपूर्ण चित्रपट आहे". "मराठी रसिक प्रेक्षकांसाठी हा एक नवीन रोमांचक अनुभव असेल याची मला खात्री आहे".

खास आकर्षण असेलला मी. युनिव्हर्स संग्राम चौगुले. हा " दंडम" ह्या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच पदार्पण करत आहे. तो याविषयी बोलताना म्हणाला, "पडद्यावर ॲक्टिंगच्या जोडीला ॲक्शन होती आणि ॲक्टर होण्याचं माझं स्वप्नही होतं. त्यामुळे मला हा चित्रपट ऑफर झाला तेव्हा कथानक ऐकल्यावर लगेच मी होकार कळवला. आता चित्रपट सिनेमागृहात यायचा दिवस जवळ आला आहे. कोणतीही गोष्ट सुरुवातीला करताना दडपण येते आणि मीही त्यातून सुटलेलो नाही. इथे प्रेक्षकांपेक्षा मोठा कोणताच कलाकार नाही. माझ्या चाहत्यांनी आजवर मला जे प्रेम दिलं त्याप्रमाणे हा चित्रपट पाहिल्यावर प्रेक्षकही देतील याची मला खात्री आहे."

"दंडम" चित्रपटातील जिभेवर सहज रुळणारी गाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ह्या चित्रपटातील ' द बंगळंग सॉंग ' हे गाणं  यूट्यूबवर सध्या धुमाकूळ घालत आहे. ह्या गाण्याबरोबरच, 'दिल माझं बिगी बिगी', 'झंझावत' ही प्रसेनजीत कोसंबी, जसराज जोशी, आदर्श शिंदे, आनंदी जोशी यांनी गायलेली गाणीसुद्धा यूट्यूबवर  प्रदर्शित करण्यात येणार आहेत आणि रसिक प्रेक्षकांना ती नक्कीच आवडतील.

या चित्रपटाच्या मार्केटिंगची संपूर्ण जबाबदारी अनासपुरे फिल्म पब्लिसिटी अँड मीडिया हाऊसच्या राजू अनासपुरे, आदित्य पाटील आणि ऋचा बाक्रे यांनी सांभाळली आहे.


बीड सारख्या ग्रामीण भागाचा विकास करू इच्छिणारा एक प्रामाणिक कार्यसम्राट कलेक्टर ' दंडम' मधून आपल्याला दिसेल. एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या मागे सामान्य जनता कशी उभी राहते हे आपल्याला पाहता येईल. भ्रष्ट व्यवस्थेमध्ये दबून न जाता एक अधिकारी काय बदल घडवू शकतो ह्या संबंधीची ही सुरस कथा आहे. आशयघन कथानक, दमदार ॲक्शन, मोहक अदा, उत्कृष्ट संगीत, इत्यादींनी परिपूर्ण असलेला ' दंडम ' २७ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

 

Trailer Link -

 

https://youtu.be/1pw1Ly3B3mE

First-ever big action Marathi film 'Dandam' is set to release on 27 December 2019.

Most of the Maharashtrians tempt to watch Tollywood movies not because they are action movies but because they have meaningful content, preserving the authenticity of their culture. The depth of human emotions, life values are well explored. South films have good visuals, screenplay and they are technically strong. The audience seems to be craving to watch south movies even in dubbed form because of all these various aspects.