वावराचा बांध आहे तसाच आहे .*

*वावराचा बांध आहे तसाच आहे .*
👇👇👇👇👇👇
*सगळ्या गावांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल तर बांध.
 एकरभर पडीक पडलेली जमीन असते ती कसायला मनुष्यबळ नाही. वेळही नाही. पण पठ्ठ्याला शेजारच्याचा बांध कोरायला फार वेळ असतो.
मला अजुनही समजलेच नाही की 
या बांधात काय अडकलेले असते. एक पाभर दोन पाभर जास्तीत जास्त एक गुंठा लुबाडली तर किती उत्पन्न निघत असेल.
   पण मराठी माणुस तो भावाचा बदला घेतल्याशिवाय चैन पडतच नाही. एकाच आई बापाच्या पोटी जन्म घेतलेला कट्टर शत्रू बनतो.अन एक भला बांध दोघांमध्ये निर्माण होतो.
 असे अनेक बांध आयुष्यात असतात.
 लोकांच्या जमीनी कोरुन करोडपती झाल्याची एकतरी बातमी कधी ऐकलीय का?. पण आम्ही दळभद्री माणसे बांध कोरायचे बंदच होत नाहीत.
 माझी दहा एकर....पंधरा एकर...पाईन...नुसतेया बाता ऐकायच्या !
या मायभुमीवर किती आले आणि किती गेले ती आहे तशीच जागेवर आहे. आपण फक्त  बाता  मारायच्या....


याच मायभूमीने 
जन्माला घातले...वाढवले... पालनपोषण केले....आणि शेवटी स्वतःमधे सामावुन घेतले. आणि डोळ्यादेखत मी मी म्हणणारे वाघासारखे डरकाळ्या फोडणारे अक्षरशः धुळीला मिळाले..पण आम्ही मात्र तसेच सांड...काहीच फरक नाही...दोन दिवसाचे तारुण्य ,शक्ती संपली की मग ताळ्यावर येतो..


बांध कोरणारांनी
 बंगले बांधले नाहीत..अलिशान गाड्या घेतल्या नाहीत कारण ज्यांनी बंगले बांधले , अलिशान गाड्या घेतल्या..,त्यांना काहीतरी साध्य करण्याच्या नादात बांध कोरायला वेळच  नव्हता...


असे म्हणतात की 
टिव्हीवर , पेपरमध्ये बीएडब्ल्यु , मर्सिडीज , जॕग्वार...अॉडी..अशा गाड्यांच्या जाहीराती का नसतात..कारण ह्या गाड्या खरेदी करणारे जाहीराती पाहत बसत नाहीत.
 त्यांना वेळच नसतो...ते बीझी असतात ध्येय प्राप्तीसाठी..


 पण इथे बांध कोरणारे भाकरीला महाग असतात..
नुसत्या शर्टाची बटणे उघडी ठेऊन छाती छप्पन्न इंचाची होत नाही. पाने खाऊन तोंडं लाल केली म्हणून कोणी पाटील होत नाही...रोज दारुच्या बाटल्या रिचवुन राजेमहाराजे होता येत नाही...पत्त्या जुगारांचा आड्डा झिजवुन कोणी शर्यत जिंकत नाही !


दररोज लोकांची निंदा नालस्ती..करायची ह्याला नावे ठेव ..त्याला नावे ठेव असे करुन कोणीच प्रशासकीय अधिकारी झाला नाही.थोडक्यात काय तर.....शेणातला किडा शेणातच राहतो..त्या फुलातला मकरंद काय कळणार    ?


शेवटी...आयुष्य मर्यादित आहे.
आनंद बिनधास्त घेत जगा..दुःखाचे प्रदर्शन करत जगण्यापेक्षा..प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या...मातीत जन्मलास...मातीत विलिन होणार...मग मिजास काय कामाची  ? माणुस म्हणुन जगा ना बाबा.....लोकांची वाट लावायच्या नादात...तुझी केव्हा वाट लागेल हे कळणार पण नाही...


*बांध कोरण्यापेक्षा आप आपसातील शत्रृत्वाचे बांध नष्ट करुयात....*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏