*एक पाऊल महिला डिजीटल साक्षरताकडे...!*
*महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि दृष्टी व्हिजन फॉर ब्लाईंड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला डिजिटल साक्षरता कार्यशाळा -2019* दि. 26 डिसेंबर 2019 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले सभागृह, गंज पेठ, पुणे येथे आयोजित केली गेली या कार्यशाळेमध्ये महिलांसाठी *उमंग आणि तेजस्विनी* सुरक्षा संबंधी, व्यवहारसंबंधी *भीम-पे*, उद्योगविषयी- *जेम-पोर्टल*, यु ट्यूब च्या माध्यमातुन जेवणाच्या रेसिपी पाहुन स्वतःचा व्यवसाय देखील सुरू करता येऊ शकतो, *आपले सरकार* ऍप वरून विविध प्रकारचे दस्तावेज स्वतः काढणे, *७/१२ - महाराष्ट्र* ऍप वरून ७/१२ आणि ८अ उतारा ऑनलाईन काढणे, *नमो ऍप* - पंतप्रधानांशी थेट संवाद, *Digilocker App* गाडीची कागदपत्रे, लायसन्स, आधार कार्ड, पॅनकार्ड या सर्व ऑनलाईन ऍप बद्दल प्रात्यक्षिक स्वरूपात जवळ जवळ 200 हुन जास्त महिलांना माहिती *प्रशिक्षिका-अर्चना दहिवळ* यांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे
1. *नगरसेवक, पुणे मा. श्री. अजयभाऊ खेडेकर*,
2. **नगरसेविका, पुणे मा. आरतीताई कोंढरे*,
3. *नगरसेविका, पुणे मा. विजया लक्ष्मी हरिहर*
4. *मा. आसमा शेख ( महिला व बाल विकास मंत्रालय, पुणे )*
5. *मा. मंजिरी कुलकर्णी ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोहमार्ग, पुणे )*
6. *मा. सूर्यभान जाधव ( डेव्हलपमेंट असोसिएट, व्हिजन इंडिया फौंडेशन, दिल्ली )*
7. *मा. संकेत देशपांडे ( अध्यक्ष, मैत्र युवा फौंडेशन, पुणे)*
वरील सर्व पाहुण्यांनी या डिजिटल कार्यशाळेसाठी आपआपल्या प्रमाणे मार्गदर्शन करून कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या आणि *महिलांनी निडर , आत्मविश्वास ठेवुन एक पाऊल उचलत स्वतः चा विकास केला पाहिजे तसेच महिलांचा विकास म्हणजे आपल्या देशाचा विकास असा संदेश* दिला
*दृष्टी व्हिजन फॉर ब्लाइंड, पुणे या संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्री . सागर धुमाळ* यांनी एक पाऊल महिला सक्षमीकरणाकडे याकडे पाहता या २०१९ वर्ष्यापासून समाजातील महिलांना प्रेरणा मिळावी व त्यांचा विकास व्हावा यासाठी आजच्या कार्यक्रमात ज्यांनी सामाजिक , औद्योगिक आणि प्रेरणादायी वक्ता म्हणुन नाव कमावलेल्या अश्या *श्रीमती. उषा ताई शिवाजी इंगोले* पाटील आणि मागील 20 वर्ष्यापासून पुणे महानगरपालिका च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अश्या *मा. अलका ताई गुजनाळ* या दोघींना दृष्टी संस्थेकडुन
*दृष्टी महिला सक्षमीकरण पुरस्कार - २०१९* पुरस्कार प्रदान करण्यात आला.
डिजिटल साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्याची संधी महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी त्याबद्दल दृष्टी या सामाजिक संस्थेकडुन खुप खुप धन्यवाद...!
कार्यक्रमाचे *सूत्रसंचालन RJ गौरव मालक(दिव्यांग) आणि ऋतुजा शिंदे, अलका गुजनाळ* यांनी केले तसेच *आभार प्रदर्शन - दृष्टी संस्थेच्या खजिनदार श्रीमती. भावना कुतवळ-पाटील* यांनी केले
तसेच या कार्यशाळेसाला पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी *मा. वसुधा देशपांडे, अमोल पाटील ,तन्मय कोळी , आशिष गुरव , गौरव शहाणे, राजू शिंदे, सत्यजित सीमा संजय आणि बचत गट, पुणे महानगरपालिका* आदींनी खुप खुप सहकार्य केले त्याबद्दल दृष्टी संस्थेच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन...!