प्रेस नोट
अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस आयोजित
मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ला चांगला प्रतिसाद
-----------------------
*असाधारण यशासाठी असाधारण मेहनत आवश्यक:डॉ. पी. ए. इनामदार*
पुणे :
'सर्वांना प्रगतीसाठी मेहनत करायला सारखाच वेळ परमेश्वराने दिलेला आहे. मात्र, साधारण मेहनत केली तर साधारण यश मिळणार. असाधारण मेहनत केली तरच असाधारण यश मिळू शकते', असे प्रतिपादन महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी आज केले.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या 'अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस' आयोजित एक दिवसीय 'मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम 'चे उदघाटन शुक्रवारी सकाळी डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस च्या 'हाय टेक हॉल' या सभागृहात झाला. व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी,प्राध्यापक यात सहभागी झाले .
'अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस' चे प्राचार्य आर .गणेसन यांनी स्वागत केले. यावेळी इरफान शेख,डॉ अनिता फ्रांत्झ,रोनिका अगरवाल,ऋषी आचार्य,डॉ. मुश्ताक मुकादम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अश्फाक शेख यांनी आभार मानले .
यावेळी बोलताना डॉ पी ए इनामदार म्हणाले, 'खडतर परिस्थितीतून प्रगती केल्याने आपल्याला इतरांच्या समस्या समजू शकतात. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रामाणिक माणसाच्या शोधात सर्वच जण असतात. म्हणून प्रामाणिक राहून काम करा.24 तास सर्वांकडेच असतात. त्याचा प्रभावी वापर करा. परमेश्वर तुम्हाला बळ देतो, तेव्हा त्यामागे काही योजना असते, बुद्धिमान व्यक्ती ती ईश्वरी योजना समजून घेत असते. आणि आयुष्यात इतरांसाठी झटत असत . प्रत्येकाला काम करायला आयुष्यात २४ तास मिळतात. त्यातील 16 तास करायला कोणी रोखलेले नसते. इतरांबद्दल वाईट बोलण्यात वेळ घालवणे चुकीचे आहे. सकारात्मक बोलायला शिकले पाहिजे. आपल्याला कार्यक्षेत्रात उत्तमतेचा आग्रह धरला पाहिजे.जीवनात शक्यतो कर्ज घेवू नका, असतील तेवढ्याच पैशावर काम करा'.
ते पुढे म्हणाले ,'जात, पात, प्रांत, भाषा यामुळे आपल्या प्रगतीत अडथळा येत नाही. या शैक्षणिक कॅम्पसमध्ये त्यामुळे भेदभाव होत नाही. येणाऱ्या पिढ्या सुखी होण्यासाठी प्रयत्न करीत आल्या आहेत, तोच कित्ता गिरवला पाहिजे. त्यामुळे देश पुढे जात आहे. लोकशाही व्यवस्थेत आपली प्रगती होते, यावर विश्वास ठेवला पाहिजे.
'शिक्षक हाच मेंटोर असतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर मेहनत घेतली पाहिजे. शिक्षकांचे फोटो विद्यार्थ्यांच्या घरात लागले पाहिजेत,इतके योगदान शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात दिले पाहिजे',असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
.............................................