साता जल्माच्या गाठी’मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष नंदादेवींच्या विरोधात उभी ठाकणार श्रुती

साता जल्माच्या गाठी'मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष


नंदादेवींच्या विरोधात उभी ठाकणार श्रुती


 


स्टार प्रवाहवरील 'साता जल्माच्या गाठी' ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. नंदादेवींनी रघु आणि श्रुतीच्या लग्नाचा आखलेला प्लॅन यशस्वी तर झाला. पण लग्नानंतर श्रुती कशी वागेल? तिला कसं मुठीत ठेवता येईल? हे त्यांनी आखलेले मनसुबे मात्र फोल ठरत आहेत. रघुसोबत लग्न लावून देण्यात नंदादेवींचं कारस्थान होतं हे सत्य श्रुतीसमोर उघड झालंय. श्रुतीच्या प्रेमासाठी कायपण करण्यासाठी तयार असणारा युवराज तिचं लग्न रघुशी लावून देईल असं श्रुतीला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणूनच श्रुतीच्या मनात आता युवराजविषयी प्रचंड तिरस्काराची भावना आहे. नंदादेवींना जाब विचारण्याचं धैर्य आजवर कुणीच दाखवलं नाहीय मात्र श्रुती नंदादेवींना आपली फसवणुक का केली याचा जाब विचारणार आहे. इतकंच नाही तर नंदादेवींच्या वर्चस्वालाही आव्हान देणार आहे.


त्यामुळे 'साता जल्माच्या गाठी' मालिकेच्या यापुढील एपिसोड्समध्ये नंदादेवी विरुद्ध श्रुती असा संघर्ष पाहायला मिळेल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या श्रुतीला रघु साथ देणार का? युवराज कोणाच्या पाठीशी ठामपणे उभा रहाणार? हे पहाणं औत्सुक्याचं असले. त्यासाठी पाहायला विसरु नका साता जल्माच्या गाठी सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर