भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित  महारक्तदान शिबिरात १३०० जणांचा सहभाग* 

Press note


*भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित  महारक्तदान शिबिरात १३०० जणांचा सहभाग*


पुणे:


भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित महारक्तदान शिबिरात १३०० जणांनी सहभाग घेतला.हे शिबीर १३ जानेवारी रोजी पूर्ण दिवस धनकवडी कॅम्पस मध्ये सुरु होते. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते महारक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. भारती अभिमत विद्यापीठचे संस्थापक स्व.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त तसेच सहकार राज्यमंत्री आणि भारती विद्यापीठाचे सचिव डॉ.विश्वजित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. 


भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ.आनंद भालेराव यांनी स्वागत केले.  


उद्घाटन कार्यक्रमात बोलताना संदीप पाटील म्हणाले 'रक्तदान हे सर्वोच्च मानवी कर्तव्य आहे,वेळोवेळी ते करीत राहिले पाहिजे. सेवा हाच धर्म अशी शिकवण भारतीय संस्कृतीने दिली आहे.ज्ञानदान आणि रक्तदानाने मानवतेला मदत होते. भारती विद्यापीठसारख्या संस्थेत दोन्हीचा संगम होतो आहे,ही आनंदाची बाब आहे.अभियांत्रिकी विद्यार्थ्यांकडे असलेल्या विशेष ज्ञानामुळे ते समाजाची विशेष सेवा करू शकतात आणि रक्तदानासारख्या उपक्रमातून त्यांना समाजाला देण्याची सवय लागते आहे,हेही उल्लेखनीय आहे.'


प्राचार्य डॉ.आनंद भालेराव म्हणाले,'स्व.पतंगराव कदम यांनी केवळ पदव्या देण्यासाठी शिक्षण संस्थेचा विस्तार केला नाही,तर त्यांना समाजपरिवर्तन घडवून आणणारे विद्यार्थी घडवायचे होते. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास त्यांनी सदैव घेतला.रक्तदान शिबिरातून या ध्यासाचे स्मरण आम्ही सर्व जण करीत असतो'.


रक्तदान शिबिराचे हे ३१ वे वर्ष होते.
----------------------------------