प्रेस नोट.
जावंक क्र . १०२९ /२०२० दि . १३/०१/२०२०
प्रति,
मा.जिल्हाधिकारी साहेब
नाशिक
द्वारा
मा.नरेंदजी मोदी साहेब
पंतप्रधान ,भारत सरकार
मा.उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री ,महाराष्ट्र राज्य.
विषय :- ‘आज के शिवाजी - नरेंद्र मोदी असं पुस्तक लिहिणाऱ्यावर व पुस्तकावर बंदी घालणे .....
मा.महोदय,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आल्याचा प्रकार घडवून आणला आहे. ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी असं पुस्तक लिहिण्यात आलं असून, या पुस्तकाचे भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात निर्लजपणाने प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकावरून अखंड हिंदुस्तानात प्रचंड रोष निर्माण झाला आहे . सर्वच माध्यमातून यावर संताप व्यक्त केला जात आहे. तसेच या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने केली जात आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करून काय साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे . या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपाच्या उपस्तित
नेत्यांसह ,जय भगवान गोयल यांनी हे पुस्तक लिहिलं या सर्वांवर तमाम शिव भक्तांचा रोष असून त्यांना वेळेत लगाम घातला नाही तर अशा उधळणाऱ्याचा समाचार आम्ही घेऊच परंतु आपण देखील या मनोवृत्तीला वेळीच ठेचलं पाहिजे अशी आमची मागणी आहे .
शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय युगपुरुष आहेत. त्यांच्याशी तुलना होऊ शकणारा माणूस अजून जन्माला आलेला नाही आणि येणारही नाही. या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने आपल्या माध्यमातून केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तीमत्व आणि कार्य अतुलनीय आहे. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही सर येणार नाही. त्यांच्या नावाचा जयजय कार करून सत्ता मिळवणे वेगळं आणि त्यांच्या सारखं काम करण्याचा प्रयत्न करणे वेगळं आहे हे आजकालचे राजकारणी चापलुसीत विसरले आहे . आधी छत्रपतींचे आचार ,विचार आत्मसात करा स्वतः पुस्तक छापून प्रतिमेच्या शेजारी प्रतिमा छापली म्हणजे कोण्ही छत्रपती शिवाजी महाराज होऊ पाहत असेल किव्हा करण्याचा प्रयत्न करत असेल अशा नमोरुग्णांना वेळीच आवर घालावा लागेल अन्यथा अशांना इस्पितळात भरती करण्याची परवानगी मिळावी .
आमची मागणी त्वरित उच्य स्तरावर कळवावी अन्यथा छावा क्रांतिवीर सेना तीव्र आंदोलन करेल याची सर्वस्वी जबाबदारी आमच्या भावना भडकावणाऱ्याची असेल याची नोंद घ्यावी हि नम्र विनंती. यावेळी करण गायकर,संस्थापक अध्यक्ष ,प्रा.उमेश शिंदे प्रदेश अध्यक्ष - विद्यार्थी सेना ,विजय खर्जुल ,राजू देसले ,संतोष माळोदे , नितीन सातपुते ,निलेश मोरे ,सागर पवार ,वैभव दळवी ,अर्जुन शिरसाठ ,सुभाष गायकर ,मनोरमा पाटील ,अयाज काजी,नाशीर पटेल ,नरेंद्र भगडे ,इस्माईल शेख,गणेश पवार ,गणेश ढिकले ,दीपक जगताप ,गणेश काजले ,भरत निसाळ ,सुरेश पाटील ,गणेश गायकवाड ,अनिल गुंजाळ ,अनिल मेघाल,
आदी उपस्थित होते.