*विमुक्त-घुमंतु,बारा-बुलतेदार,ओबीसी,अतिपिछडा सेवा संघ यांच्या वतीने बंजारा समाजाचे मेळाव्याचे 25 वे रौप्य महोत्सव उत्साहात पार पडले......!*
बंजारा सामाजासाठी 5 जानेवारी हे दिवस आनंद,उल्हास व उत्सवाचे आहे असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही.कारण बंजारा समाजाचे शान असणारे नेते,माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड साहेबांनी समाजासाठी अहोरात्र झगडून दर वर्षी 5 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे बंजारा समाज प्रबोधन व जनजागृती आणि समाजावर होणाऱ्या अन्याय-अत्याचार तसेच समाजाच्या विविध मागणी करिता बंजारा मेळावा भरवितात.सदर बंजारा समाजाचे मेळावा न चुकता गेली 25 वर्ष 5 जानेवारी रोजी हा मेळावा भरवित आले आहे,त्यामुळे यंदाच्या वर्षी 5 जानेवारी 2020 हे रौप्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला आहे.आदरणीय माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरिभाऊ राठोड साहेब यांच्या परिश्रम व सातत्याला लाख-लाख सलाम...!
सदर बंजारा मेळावा रौप्य महोस्तव मध्ये बंजारा महंत बाबुसिंग महाराज,महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार सुभाष देसाई साहेब,वने व पर्यावरण मंत्री मंत्री नामदार संजयभाऊ राठोड साहेब,माजी खासदार तथा विद्यमान आमदार हरीभाऊ राठोड साहेब,आमदार प्रकाश शेंडगे साहेब,कर्नाटक राज्याचे माजी मंत्री नामदार शिवमूर्ती नाईक साहेब,माजी आमदार मनोहर ऐनापूर साहेब,माजी न्यायमूर्ती नामदेव चव्हाण साहेब,माजी न्यायमूर्ती गोविंद राठोड साहेब,बंजारा दानशूर व्यक्तिमत्व शंकर पवार साहेब,पोलीस दिनेश राठोड,शिवाभाऊ राठोड,कैलास डि.राठोड,निलेश जाधव,जगदीश राठोड,विरेंद्र रत्ने,महेश भाट,बाबुराव राठोड,डॉ.पी.बी कुंभार,आत्माराम जाधव,अशोक जाधव,ग्यानसिंग जाधव,राजेश चव्हाण,संजय राठोड,गोविंद राठोड,सतीश राठोड,अवि चव्हाण,प्रकाश राठोड,रोहित पवार,कांतीलाल नाईक,राज राठोड,जिजाताई राठोड,मायाताई राठोड,साधनाताई राठोड,विद्याताई चव्हाण,कल्पनाताई राठोड,जनाबाई राठोड,संतोष चव्हाण,अनिल राठोड,निलेश जाधव,अमित राठोड,सुभाष राठोड,सुनील जाधव....इत्यादी मान्यवर आणि असंख्य बंजारा बंधू-भगिनी तसेच देशातून आलेले असंख्य विमुक्त-घुमंतु,बारा-बलुतेदार,ओबीसी,अतिपिछडा समाजातील बहुसंख्य बांधव देखील सदर मेळाव्याला उपस्थित होते.
सदर रौप्य महोत्सव मेळावा मध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या समाज बांधवांचे सामाजीक समाजभूषण पुरस्कार देऊन सर्वांचे यथोचित सत्कार देखील करण्यात आले.या मेळाव्याचे व समाजभूषण पुरस्काराचे एक हिस्सा मी पण राहिलो,आणि उपस्थित बांधवासमोर माझे मनोगत व्यक्त केले याचा मला आज खूप आनंद झाला आहे.सदर बंजारा समाजाचे रौप्य महोत्सव मेळाव्याचे सर्वेसर्वा माजी खासदार तथा विद्यमान आमदार,बंजारा सामाजाची शान,सन्माननिय हरिभाऊ राठोड साहेबांनी केले होते.या मेळाव्याचे सूत्र संचालन बंजारा समाजाचे गीतकार-गायक राजेश पवार यांनी केले.सदर ऐतिहासिक रौप्य महोत्सव बंजारा मेळावा दिनांक 5 जानेवारी 2020 रोजी,आझाद मैदान-मुंबई येथे भरविण्यात आले होते.सदर मेळाव्यामधील काही अनमोल क्षणचित्रे.....!
विमुक्त-घुमंतु,बारा-बुलतेदार,ओबीसी,अतिपिछडा सेवा संघ यांच्या वतीने बंजारा समाजाचे मेळाव्याचे 25 वे रौप्य महोत्सव उत्साहात पार पडले