कर्जत -मुरबाड रस्त्यावरून अवजड वाहतूक बंद.ू
कर्जत दि. 8 गणेश पवार
कर्जत तालुक्यातील पोश्री नदीवर कळंब येथे असलेला जुन्या पुलाची स्थिती नाजूक असल्याने त्या पुलास कोणताही धोका निर्माण झाल्यास या रस्त्याने होणारी वाहतूक बंद होऊ शकते. हि बाब लक्षात घेऊन आणि राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी दिलेल्या अहवालानुसार रायगड जिल्हा प्रशासनाने आज 7 जानेवारी पासून अवजड वाहने यांच्या वाहतुकीस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महारोग 548 चे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण काम केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सुरु आहे.या रस्त्यावर सध्या एकरी वाहतूक होत असून हा जुना राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्गात रूपांतरित करण्यात आल्याने या रस्त्याचे दुपदरीकरण केले जात आहे.राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी केलेल्या अहवालात कळंब येथील पोश्री नदीवर असलेला पूल हा शीत झाला असून त्यावरून वाहतूक होत असताना अपघात घडल्यास पुढे कर्जत- मुरबाड रस्त्याची वाहतूक बंद होऊ शकते. तसे झाल्यास नाशिककडून जेएनपिटी बंदराकडे जाणारी वाहतूक बंद पडण्याची भीतीनिर्माण झाली आहे.तसा अहवाल राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या अभियंता असलेल्या दोन सल्लागार कंपनी यांच्याकडून नमूद करण्यात आले होते. हि बाब राज्य रस्ते वाहतूक मंत्रालयाने रायगड चे पोलीस प्रमुख यांच्या कार्यालयाकडे अहवालाच्या स्वरूपात सादर केल्यानंतर रायगड पोलीस आणि वाहतूक शाखा यांचे पथक कर्जत येथे आले आणि त्यांनी कळंब येथील पुलाची पाहणी केली. त्यावेळी राज्य रस्ते विकास महामंडळाचे अभियंते देखील सोबत होते. त्यांनतर सर्व अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी रायगड जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांना सादर केला होता. 24 डिसेंबर रोजी तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारची परवानगी घेऊन आज ७ जानेवारी पासून कर्जत- मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्याबाबत रायुगाद जिल्हाधिकारी डॉ सूर्यवंशी यांनी निर्णय जरी केला आहे.
कळंब येथिल पुलास काही धोका निर्माण झाल्यास निर्माण होणारी स्थिती लक्षात घेवूं रायगड जिल्हा प्रशासन यांनी शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राष्ट्रीय महामार्ग 548 वर अवजड वाहतूक यांना बंदी घालण्यात आली आहे. किलोमीटर 43 ते किलोमीटर 69 या दरम्यान हि बंदी अवजड वाहने यांना लागू करण्यात आली आहे. त्यासाठी अवजड वाहने यांना नाशिक येथून कर्जत कडे जाताना मुरबाड म्हसा येथून पाटगाव मार्गे बदलापूर आणि तेथून क्षत्रप-नेरळ- कर्जत असा प्रवास करावा असे सूचित केले आहे. त्याचवेळी जेएनपिटी कडून नाशिक कडे जाणारी वाहने हि कर्जत वरून नेरळ-बदलापूर अशी होऊन बाटलीच्या वाडी मार्गे पुन्हा मुरबाड कडे जाऊ शकतात. त्यास्तही नवीन राष्ट्रीय महामार्ग 548 अ निर्माण करण्यात आला आहे. त्यामुळे त्या रस्त्याने अवजड वाहने यांनी ७जानेवारी पासून पर्यायी रस्त्याचा अवलंब करावा अशे सूचित करण्यात आले आहे. त्यास्तही रायगड जिल्हा प्रशासन यांनी आदेश जारी केले आहेत.