#PRESSNOTE
*डॉ. कल्याण गंगवाल यांना 'शाकाहार धर्मदूत पुरस्कार'*
*पुणे* : सदाचार, शाकाहार, व्यसनमुक्तीचे पुणे येथील कार्यकर्ते डॉ. कल्याण गंगवाल यांना नुकताच औरंगाबाद येथे 'शाकाहार धर्मदूत' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. गंगवाल यांनी शाकाहाराच्या क्षेत्रात केलेल्या अमुलाग्र कार्याबद्दल औरंगाबाद येथील जैन शिक्षण संस्था, पी यु जैन ट्रस्ट आणि दिगंबर जैन समाज यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.
डॉ. गंगवाल आणि डॉ. चंद्रकला गंगवाल यांनी ट्रस्टचे अध्यक्ष महावीर सेठी, सचिव आशादेवी काला, कोषाध्यक्ष डॉ. रमेश बडजाते, ललित पाटणी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. कार्यक्रमाला औरंगाबाद येथील जैन समाजाचे प्रतिष्ठित उद्योगपती तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. चंद्रकला गंगवाल यांनी पी यु जैन विद्यालयातील गरजु विद्यार्थ्यांकरीत गणवेशासाठी ५१ हजार रुपयांची देणगी मदत म्हणून दिली.
डॉ. गंगवाल म्हणले, ''शाकाहार, अहिंसा आणि जीव दया यासाठी गेली पन्नास वर्ष सातत्याने जे कार्य करत आहे, त्याचा हा सन्मान आहे. जैन धर्माचे मूलभूत तत्त्व अहिंसा परमो धर्मः आहे. जैन जीवनशैलीही आज संपूर्ण जगात आदर्श जीवनशैली मानली जाते. पर्यावरण रक्षण, ग्लोबल वार्मिंग, वाढता हिंसाचार या समस्यांसाठी केवळ महावीरांचे विचार आवश्यक आहेत. हा पुरस्कार स्वीकारताना आनंद होत आहे.'' विशाल पाटोदी यांनी प्रास्ताविक तर कल्पना अजमेरा यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापिका कविता ठोळे यांनी आभार मानले.