डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्म शताब्दीनिमित्त
सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कार्यक्रमाचे आयोजन
पुणे दि.6:- महाराष्ट्राच्या लोककला व लोकसंस्कृतीच्या गाढया अभ्यासक व प्रसिध्द लेखिका डॉ. सरोजिनी बाबर यांच्या जन्म शताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्र - कर्तृत्वाचा वेध घेणारा "रानजाई" हा संगीतमय कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाकडून आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन डॉ. वंदना बोकील - कुलकर्णी यांना केले असून कार्यक्रमात त्यांच्यासह अनुराधा जोशी व गौरी देशपांडे या सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सादर होणाऱ्या गीतांना उमेश नेरकर यांनी संगीत दिले असून सविता कबनूरकर ही गीते सादर करणार आहेत व त्यांना आदित्य आपटे तालवाद्यांची साथ देणार आहेत. कार्यक्रमाची प्रकाश योजना निखिल गाडगीळ यांनी केली आहे. हा कार्यक्रम - एम. ई. एस. सोसायटी चे सभागृह, मयुर कॉलनी, कोथरुड, पुणे येथे दि. 9 जानेवारी 2020 रोजी सायं. 6 ते 8 या वेळेत सादर करण्यात येणार आहे. कार्यक्रमास सर्वांना मोफत प्रवेश आहे. रसिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून करण्यात आले आहे.
००००