*फळ प्रक्रिया उद्योग*
फळ प्रक्रिया उद्योग हा फळे अधिक काळासाठी साठवून ठेवण्यासाठीची प्रक्रिया करण्याचा उद्योग आहे. हा शेतीपूरक व्यवसाय आहे तसेच यासाठी मोठे कारखानेही असतात.
फळांचे काप सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्रात ठेवून त्यातील पाण्याचे प्रमाण कमी करता येते.
उदा - सुकेळी, आंबा पोळी, मनुका, सुके अंजीर, फणसपोळी इत्यादी.
फळांच्या गरातील किंवा रसातील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी मुख्यत्वे साखरेचा उपयोग केला जातो. उदा.: जॅम, जेली, मार्मालेड, मुरंबा, स्क्वॅश, सिरप इत्यादी.
काही फळांच्या बाबतीत मिठाचे द्रावण वापरून पदार्थांचे आयुष्य वाढविले जाते. उदा. : कच्च्या आंब्याच्या फोडी, आवळा मिठाच्या द्रावणात साठविणे, आमसूल.
फळे व त्यांपासून बनविण्यात येणारे पदार्थ बाटलीमध्ये अथवा डब्यामध्ये हवाबंद करून त्यांचे पाश्चरीकरण केले जाते. पदार्थ: बाटलीबंद वेगवेगळ्या फळांची पेये, डबाबंद फळांच्या फोडी इत्यादी.
लोणच्यामध्ये मोहरी, मसाल्याचे पदार्थ, मीठ, गोडेतेल, व्हिनेगर वापरल्याने फळांचे आयुष्य वाढते.
तापमान कमी केल्यानेसुद्धा फळे आणि त्यांचे पदार्थ जास्त काळ टिकविण्यास मदत होते. उदा.:फ्रोझन डाळिंबाचे दाणे, फ्रोझन आमरस,मटारीच्या शेंगाचे दाणे, कमी तापमानाला ताजी फळे साठविणे.
*अति शीतकरण*
फळांचा रस काढून तो निर्जंतुक करून उणे (-)३० डिग्री ते उणे(-) ४० डिग्री सेल्सिअस तापमानाला थंड करून गोठविण्यात येतो. त्यानंतर त्याच तापमानाला साठविला जातो. यामुळे त्या रसांचा स्वाद, रंग उत्तम राहतो.
*पदार्थ निर्जंतुक डबाबंद करणे संपादन करा*
या पद्धतीमध्ये फळांचा रस हवेच्या कमी दाबावर व कमी तापमानावर आटविला जातो. त्यानंतर निर्जंतुक करून प्लॅस्टिक बॅग किंवा टीनच्या डब्यामध्ये हवाबंद केला जातो.हवाबंद करण्यामुळे त्यात बाहेरील जंतूंचा शिरकाव होत नाही व तो पदार्थ टिकतो.
नियंत्रित कक्षामध्ये (उदाहरण - हवेतील वायूंच्या प्रमाणाचे नियंत्रण, तापमान नियंत्रण, आर्द्रता नियंत्रण) फळांच्या आवश्यकतेनुसार वर दिलेल्या घटकांचे प्रमाण नियंत्रित केल्यास त्याचे आयुष्यमान जास्त वाढते.
बाजारात वेगवेगळ्या वेष्टणांचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्या तंत्रज्ञानाचा उपयोग शेतीमालानुसार करूनसुद्धा फळांचे व त्यांच्यापासून बनविण्यात येणाऱ्या पदार्थांचे आयुष्य वाढविता येते. उदा. - आंबा पोळी, सुकेळी, केळीचे वेफर्स, फळांपासून बनविण्यात येणाऱ्या पावडरी इत्यादीना लॅमिनेटेड पाऊचमध्ये ठेवून पाऊचमधील सर्व हवा काढून त्याच्यामध्ये नायट्रोजन भरला जातो. नायट्रोजन निष्क्रिय वायू असल्यामुळे त्या पदार्थांवर कुठलीही प्रक्रिया न होता ते पदार्थ जसेच्या तसे जास्त दिवस टिकतात.