*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------
कृपया प्रसिध्दीसाठी
दि. ८ जानेवारी २०२०
*सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका*
*महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहनः ९ वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्काराने नवरत्नांचा सन्मान*
पुणे, दि. ८ जानेवारी: “ सावर्र्जनिक संपत्तीचे नुकसान होवू न देता शांततेच्या मार्गाने आंदोलन होणे गरजेचे असून हे शिक्षण विद्याथ्यार्ंना विद्यापीठामधून देणे गरजेचे आहे. जेव्हा आम्ही एकदुसर्यांची गोष्ट मान्य करू, तेव्हाच या विश्वात शांतता निर्माण होईल,”असे विचार महाराष्ट्रचे राज्यपाल महामहिम भगत सिंह कोश्यारी यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे,विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रदान समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड हे होते.
या प्रसंगी सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी आर्ट डिझाइन अॅण्ड टेक्नॉलाजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव हे उपस्थित होते.
यावेळी कृषीरत्न हा पुरस्कार विष्णुपंत केरू गायखे (रा.पळसे, ता.जि.नाशिक), समाजरत्न कुशावर्ता चंद्रशेखर बेळे (मु.पो.ता. देवणी, जि. लातूर), आरोग्यरत्न डॉ.संदीप मनोहर डोळे (मु.पो.नारायणगांव, ता.जुन्नर, जि.पुणे), शिक्षणरत्न सुधीर बाळासाहेब खाडे (नळदुर्ग,ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद), क्रीडारत्न ऋचा राहुल धोपेश्वर (पुणे), ग्रामरत्न पुरूषोत्तम अंबादास घोगरे (खिरगव्हाण समशेरपूर, जि. अमरावती), बचतगटरत्न पुजा नितीन खडसे (दोंडाईचे, ता. सिंदखेड, जि. धुळे), जनजागरण रत्न जयप्रकाश आसाराम दगडे (लातूर) व अध्यातरत्न ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे (मु.पो. राजेश कोठे नगर, सोलापूर) यांना प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, संत श्री ज्ञानेश्वर माऊलीची प्रतिमा व प्रत्येकी रू.११,००० रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
या वेळेस ‘राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड नवरत्न परिचय’ पुस्तकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,“ फीट इंडियासाठी सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज समाजातील मत भिन्नतेमुळे शांती निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे शिक्षण देणे गरजेचे आहे, की ज्यामुळे सरकारी संपत्तीचे नुकसान होणार नाही. विश्व शांतीसाठी सर्वप्रथम आत्मज्ञान होणे गरजेचे आहे. समाज एकत्रित आणण्यासाठी या देशात गणेशोत्सवाची सुरूवात झाली होती. पण, आज याची स्थिती वेगळी झाली आहे. या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने जे नऊरत्न शोधले त्यामुळे नक्कीच येथील विद्यार्थी हा नवरत्नसारखा बनेल.”
“या विद्यापीठातून सर्वांना संदेश दिला जावा की कोणत्याही संपत्तीचे नुकसान होऊ देवू नका. सत्यचा भाव होऊ दया. हा संदेश युवकांना दया. संस्कार चांगले असावे त्यात आपली भूमिका चांगली असेल. लिबरल त्यांना म्हणतो जो सर्वांना सोबत घेऊन जवळ करतो. पीस केव्हा येईल जेव्हा आम्ही एकदुसर्यांची गोष्ट मान्य करू. वेळे नुसार काही मापदंड ठेवणे गरजेचे आहे. दुसर्यांचा आदर कराण्याची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळावी. ”
मुरलीधर मोहळ म्हणाले,“ शिक्षण व संस्कृतीची पार्श्वभूमी लाभलेल्या या पुण्यनगरीत डॉ. कराड यांनी शून्यातून शिक्षणाचे काम सुरू केले आहे. ही संस्था सामाजमन व सामाजिक बांधिलकी ओळखते. या पुरस्कारचा मुख्य उद्देश हाच आहे की समाजात चांगले कार्य घडत रहावे. दादाराव कराड यांच्या विचारातून व मार्गदर्शनातून समाजात लोक चांगले कार्य करतील.”
प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ ही संस्था स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानावर कार्य करीत आहे. स्वातंत्रसेनेच्या रूपाने कार्य करणारे आमचे वडील खर्या अर्थाने ते राष्ट्रधर्मपूजक होते. या देशाला ‘वसुधैव कुटुंबकम’ची वैश्विक परंपरा आहे. भगवदगीता व ज्ञानेश्वरी हे धार्मिक ग्रंथ नसून ते जीवन ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीचे छोटे दर्शन येथे होत आहे. त्याग आणि समर्पणाचे येथे दर्शन घडले आहे. आपल्यासारख्या लोकांच्या कार्यातून भारत हा २१व्या शतकात विश्वगुरू म्हणून उदयास येईल.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“ विश्वशांती व संस्कार देणारे हे विद्यापीठ पुढील काळात संस्कार देणारे पीठ बनेल. १३५ कोटीच्या लोकसंख्येच्या या देशातील गावा गावापर्यंत चांगले कार्य पोहचविण्याचे कार्य या विद्यापीठातून होत राहील.”
पुरस्काराला उत्तर देताना जयप्रकाश दगडे म्हणाले,“ मनापासून ऋण व्यक्त करतो. ज्यांचा येथे सत्कार होत आहे ते सर्व ग्रामीण भागातील हिरो आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा आज खर्या अर्थाने गौरव झाला आहे. तळागळात काम करणार्या व्यक्तींचा शोध एमआयटीने पूर्ण केला. जगाला सध्या पर्यावरणाचा धोका आहे त्या दृष्टीने कार्य करावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.”
राहुल विश्वनाथ कराड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आम्ही समाजातील उत्तम कार्य करणारे व्यक्ती ज्यांचे नाव अद्याप जनतेपर्यंत पोहचले नाही अशा व्यक्तिंचा येथे गौरव केला जात आहे. यांचे उदाहरण तरूण पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणेफोटो ओळ-.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे,विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ९व्या राष्ट्रधर्मपूजक दादारावकराड राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान समारंभात पुरस्कारार्थींसमवेत डावीकडून डॉ. एन.टी.राव, राहुल विश्वनाथ कराड, डॉ. विश्वनाथ कराड, भगतसिंह कोश्यारी, मुरलीधर मोहळ, डॉ. विजय भटकर, डॉ. मंगेश कराड व मधुकर भावे.
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*------
■★■★★■★◆★◆★◆★
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल* ......
बातम्या - जाहिरात आणि अधिक माहितीसाठी
*संपादक संतोष सागवेकर*
*मोबाईल नंबर -९५८८६०३०५१*
*वर संपर्क साधावा*
*साप्ताहिक पुणे प्रवाह*
*Youtube _ Facebook* _
*Instagram Twitter*
*वर ही*
*आता पुणे प्रवाह*
..................
*वरील सर्व पेज लाईक* -
*सबस्काईब करून*,
*घंटी चे बटन ही दाबण्यास् विसरू नये,*
*विंनती*
~~~~
*पुणे प्रवाह परिवारांशी*
*आपले नातेसंबंध अधिक घट्ट करू या....*
★★★★
*सदैव राहा*
*पुणे प्रवाह परिवारांच्या*
*सोबत अपडेट*
👌👍✌🙏