तिळगूळ, भक्तीभावाचा, देशाभिमानाचा*! 

*तिळगूळ, भक्तीभावाचा, देशाभिमानाचा*!
🤝🤝🇮🇳🤝🤝
मेहूणपुरा मंडळ आणि सैनिक मित्र परिवाराचे वतीने, सरहद्दीवरील जवानांना,पुणेकरांच्या वतीने, नुकताच  कृतज्ञतापूर्वक तिळगूळ पाठवण्याचा शुभारंभ करण्यात आला. मराठा लाईट इन्फन्ट्रीचे निवृत्त,हवालदार  संजय नाळे, हवालदार बजरंग निंबाळकर आणि सहका-यांचे हस्ते, तिळगूळाचे या प्रसंगी पूजन करण्यात आले. 
प्रत्यक्ष सरहद्दीवर जेव्हा ही भेट पोचते तेव्हा संक्रांतीच्या दिवशी,सर्वत्र त्याची पूजा करून, भक्तीभावाने वाटप होते, हे मी समक्ष अनुभवले आहे. 
    सरहद्दीवरील जवान, त्यांची पुनर्वसन केंद्रे, लष्करी रुग्णालये, अशा सर्व ठिकाणी हा प्रसाद पोचवण्याची संस्थेची अनेक वर्षांची प्रथा आहे. तिळगूळा बरोबर, शालेय विद्यार्थ्यांची चित्रे, शुभेच्छापत्रे सुद्धा पाठवली जातात. सहभागी होऊ इच्छित असणारांचे स्वागत आहे. 
  *आनंद सराफ*
   *पराग ठाकूर*