राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे क्रांतिकारक पाऊल इतिहासाला जन्म देणारे ठरले.

स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाचा स्त्रोत आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बालपणीचा ऊर्जा स्त्रोत म्हणजे राजमाता माँसाहेब जिजाऊ. महापुरुष निर्माण होण्यास अनुकूल परिस्तिथी व सुशिक्षण अपेक्षित असते. यालाच अनुसरून राजमाता माँसाहेब जिजाऊ यांचे क्रांतिकारक पाऊल इतिहासाला जन्म देणारे ठरले. काळाच्या कसोटीवर जिजाऊ माँसाहेब यांनी महाबली शहाजी महाराजांनी सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पेलवली आणि संपूर्ण मानवजातीला वंदनीय ठरणारे महाप्रतापी, नितिवंत, कीर्तिवंत राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आपल्या संस्काराच्या आधारे या भारतास बहाल केले. वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता आणि राजमाता या चारी भूमिकेत जिजाऊ माँसाहेबांनी आपली कामगीरी चोख बजावली. त्यांचा गौरव करताना कवि जयराम पिंडये आपल्या राधामाधवविलासचंपू या ग्रंथात लिहतो....


" जशी चंपकेषी खुले फुल्लजाई
भली शोभली ज्यास जाया जिजाई 
जिचे कीर्तिचा चंबू जंबूद्विपाला
करी साऊली माऊलीसी मुलाला " 


मराठेशाहीतील कर्तबगार महिला तसेच माता आणि गुरु यांचे जगातील सर्वोत्तम उदाहरण राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा, छत्रपती शिवाजी महाराजांना घड़वाणाऱ्या माँसाहेब जिजाऊ प्रत्येक घरात जन्माव्या हीच सदिच्छा....


*जय जिजाऊ*
             *जय शिवराय*
                            *जय शंभूराजे*


*आम्हीच ते शिवशंभु सेवक ज्यांना आस इतिहासाची अन शिव-शंभु कार्याची*


*शिवजयंती हा फक्त उत्सव नसुन तर ऐक प्रकारची आधुनिक चळवळच आहे की जी संपूर्ण शिवशंभु चरित्राचे प्रबोधनाची माहितिच्या स्वरुपात सर्वाना देणे हा आमचा हेतु आहे*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोत्सव समिति पुणे*🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩