राष्ट्रीय पल्स पोलियो मोहिम १९ जानेवारीला होणार नागपूरात.. अ.आयु. राम जोशी
-------------------------------------
नागपूर:-दि.१८जाने.(सविता कुलकर्णी):- राष्ट्रीय पल्स पोलियो मोहिम दिनांक १९ जानेवारी २०२० ला सकाळी ७ वाजता सर्व झोन मध्ये रोटरी क्लब च्या सहकार्याने लस लस पोहचविण्यासाठी सोय करण्यात येणार आहे.
भारत सरकारने देशातील पोलिओ रोगाचे निर्मूलन करण्यासाठी पल्स पोलियो मोहिम सुरु केली आहे. या अंतर्गत५ वर्षा खालील मुलांना पोलियोची लस देण्यात येते. महाराष्ट्र राज्यामध्ये सन २०११ पासून एकही पोलिओ रुग्ण आढळला नाही. परंतु आपल्या देशात एक पोलिओ रुग्ण पश्चिम बंगाल हावडा येथे आढळला होता. तीन वर्षांपासून भारतात पोलिओचा रुग्ण नाही. भारत देश २७ मार्च २०१४ ला पोलिओ मुक्त झाला व त्याचे प्रमाण पत्र मिळालेले आहे. दिनांक १९ जानेवारी २०२० (रविवार) ला नागपूर महानगरपालिका क्षेत्रात १० झोनल वैद्यकीय अधिकारी व १० स्वास्थ निरिक्षक मार्फत नागपूर शहरात मोहिमेच्या दिवशी (पी.पी.आय.) व घरोघरी भेट देऊन( आय.पी.पी.आय.) १० झोन मध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ चा डोज पाजावयाचा आहे. एकही बालक पोलिओ डोज वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
मागील वर्षी पल्स पोलिओ मोहिमेत देण्यात आलेल्या पोलिओ लसीच्या लाभार्थ्यांची संख्या-२,७६,४७३
पल्स पोलिओ च्या दिवशी तीन कर्मचारी असणारे एकूण बुथ - ९५४
पल्स पोलिओ च्या दिवशी दोन कर्मचारी असणारे एकूण बुथ - ३४७
व एकंदरीत बुथ संख्या १३०१ इतकी राहिल.
तसेच बुथवर काम करण्यासाठी ३५५६ मनुष्यबळ लागणार आहे. पी. पी. आय. ला या बुथच्या दिवशी २५८ सुपरवायझर लागणार आहे. जास्त बुथच्या दिवशी काम झाले पाहिजे याची दक्षता घेतली जाणार आहे. या करीता ट्रांझीट टिम, मंदिर, मस्जिद, माँल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक,विमानतळ, व मोबाईल टिमद्वारे, अतिजोखिमग्रस्त भाग, बांधकाम, विपभट्या, भटक्या जमातीचे मुले,रस्त्यावरील मुले, अनाथाच्या यामधिल मुलांना पोलिओ डोज पाजण्याची सोय केली आहे.तसेच स्लम भाग, स्माँल फँक्टरी एरिया व इतर ठिकाणी पोलिओ डोज पाजण्याची सोय उपल्बध आहे.
* ट्रांझीट टिम-१३ तयार करण्यात आलेले आहे. ट्रांझीट टिम करीता सुपरवाइजर-२४,तसेच मोबाईल टिम-१७ तयार करण्यात आलेली आहे.
* बेघर रस्त्यावरिल बालकांकरीता २ टिम तयार करण्मात आलेली आहे.ही टिम रात्री काम करणार आहे. आय.पी.पी.आय मध्ये ७,३६,५९९ घरांच्या घरभेटी तसेच प्रत्येक दिवशी १०५७ टिम व या टिम करीता सुपरवाइजर प्रत्येक दिवस-२०० लागणार आहेत. पल्स पोलियो बुथवर ५ वर्षाखाली बालकांना न चूकता सकाळी ८.०० ते सायंकाळी ५.००वाजता पर्यंत पोलिओची लस देण्यात येणार आहे. अशी माहिती अप्पर आयुक्त म.न.पा. राम जोशी यांनी पत्रपरिषद मध्ये माहिती दिली. यावेळी उपस्थित असलेले डाँ. गोवर्धन नवखरे, डॉ. भावना सोनकुसरे,उपसंचालक इ.होते.