भारतात राष्ट्रीय युवक दिन हा १२ जानेवारी १९८४ पासून  स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.

#भारतात राष्ट्रीय युवक दिन हा १२ जानेवारी १९८४ पासून  स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो.आजही मीं जेव्हा स्वामी विवेकानंदांच्यासंबंधीत जेव्हा बरीच पुस्तके वाचतो तेव्हा एक नवीन ऊर्जा आणि नवी दिशा मिळते.
युवक कसा असावा आणि भविष्यात कसा घडावा याची प्रचिती देणारे स्वामी विवेकानंद यांचे विचार आपणा सर्वांना आताही आणि भविष्यात सदैव उपयोगी पडणारे आहेत.त्यामुळेच सर्वात जास्त युवक संख्या असलेल्याआपल्या या भारत देशात आपण  सर्व युवकांना या दिवशी निर्धार करुयात की आपण जात- पात आणि धर्म या विळख्यात न पडता सर्व मिळून भारत देशाच्या उन्नतीसाठी आणि प्रगतीसाठी एकत्र मिळून काम करू.


"आपल्याला नवा धर्म, नवा देव आणि नवा वेद हवा आहे.कारण आपल्याला नवा भारत घडवायचा आहे."


स्वामी विवेकानंद यांचे मला भावलेले विचार - 


१. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मदत करायची असेल , तर त्या व्यक्तीचे तुमच्याशी कशा प्रकारचे वागावे असायला हवे , याची काळजी करू नका.तुम्हाला एखादे ऊच्य आणि श्रेष्ठ दर्जाचे कार्य करायचे असेल तर त्याचे फळ काय असेल , याचा विचार करू नका.


२.  कोणीही एखाद्या धर्मात जन्माला येत नसतो, परंतु           प्रत्येकजण एखाद्या धर्मासाठी जन्माला येतो.


३.  नुसते बोलण्याने काही होत नाही.ज्याच्या मनात साहस आणि ह्रुदयात प्रेम आहे , तोच माझा सहकारी होऊ शकतो.मला दुसऱ्या कुणाची गरज नाही.जगन्मातेच्या क्रुपेने मीं एकटाच एक लाख लोकांच्या बरोबर आहे.आणि मी एकटाच वीस लाखांची बरोबरी करू शकतो.


४.  जोवर तुमची स्वतःवर श्रध्दा नाही , तोवर तुम्ही ईश्वरावर श्रध्दा ठेवू शकणार नाही.


५.   मन म्हणजेच सर्वकाही , विचार म्हणजेच सर्वकाही असा विश्वास बाळगणे हा केवळ ऊच्य स्वरूपाचा जडवाद होय.


६.  तुमचा विकास आतून झाला पहिजे.तुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही, तुम्हाला कोणीही आध्यात्मिक बनवू शकत नाही.तुमच्या स्वतःच्या आत्म्याव्यतिरिक्त तुमचा दुसरा कोणीही शिक्षक नाही.


आपणा सर्वाना राष्ट्रीय युवक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..💐


आपला,
प्रविण माणिकशेठ दुधाने
(वरिष्ठ उपाध्यक्ष -राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, पुणे शहर)