020
तंदुरूस्त आरोग्य जागृतीसाठी फॅमिली फन रन, अँड वॉक
कोथरूडकरांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, दि.14 जानेवारीः पुणेकरांच्या तंदुरूस्त आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या जनजागृतीसाठी कोथरूड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘फॅमिली फन, रन अँड वॉक 2020’ पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुटुंबातील सर्वांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी एक पाऊल म्हणून ‘फॅमिली फन, रन अँड वॉक चे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये 2 वर्षापासून ते 88 वर्ष वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. याचे उदघाटन आयर्नमॅन मेजर अमित थेटे आणि एवरेस्टवीर भगवान चवले यांनी हिरवा झेंडा दाखवून केला. यावेळी परिसरातील वरिष्ठ नागरिकांबरोबरच सोसायटीचे सर्व सभासद उपस्थित होते.
‘फॅमिली फन रन अँड वॉक 2020’ चे आयोजन कोथरूड येथील हिल व्ह्यू रेसिडेन्सीतून करण्यात आली होती. 5 व 3 कि.मी ची ही ‘फॅमिली फन रन अँड वॉक हिल व्ह्यू रेसिडेन्सी नंतर आशिष गार्डन त्यानंतर महेश विद्यालय येथून यू टर्न घेऊन परत हिल व्ह्यू रेसिडेन्सी येथे आली.
या संदर्भात समन्वयक सुधिर फडके आणि न्रिपेन गोगई यांनी सांगितले की, शहरातील सर्व नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जागृती व्हावी तसेच शहरातील प्रत्येक सोसयटीने आपल्या ठिकाणी अशा प्रकारचे आयोजन करून संपूर्ण कुटुंबांनी याची प्रेरणा घ्यावी.
सुरूवातीला सर्वांसाठी वॉर्मअपचे सेशन ठेवण्यात आले होते. त्यात सर्वांनीच मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता. यावेळी नागरिकांनी सेल्फी काढून आनंद व्यक्त केला. तसेच, रन अँड वॉकची सांगता ही उत्साहात झाली.