आज मंगळवार दिनांक ०७ जानेवारी २०२० रोजी सकाळी १०.०० वाजता प्रभाग क्र.२१पिंपरी मधील श्रीमती.अनुसया वाघेरे शाळेच्या प्रांगणात नव्याने उभारलेल्या माजी कार्यकारी अभियंता कै.दिलीप गुलाबराव कुदळे २० दशलक्ष लिटर जलकुंभाचा उद्घाटन समारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष श्री.संजोगभाऊ वाघेरे-पाटील, विरोधी पक्षनेते श्री.विठ्ठल (नाना) काटे श्रीमती.संध्या दिलीप कुदळे यांच्या शुभहस्ते तसेच नगरसेविका सौ.उषाताई संजोग वाघेरे-पाटील नगरसेवक श्री.डब्बू आसवाणी,मा.नगरसेवक, मा. उपमहापोर श्री. प्रभाकर वाघेरे, नगरसेविका सौ निकीता कदम, श्री.रंगनाथशेठ कुदळे, आनंदा जाचक, अण्णा कापसे व पिंपरीतील महिला भगिनी व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सदर कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, वाय. एम. गिरी, एस. यू. सरवदे, सुनील अहिरे, रगुनाथ शेमले उपस्थित होते.
नगरसेविका सौ उषाताई संजोग वाघेरे पाटील यांनी वाढती लोकसंख्या तसेच उद्भवत असलेला पाणी प्रश्न मा.आयुक्त तसेच स्थायी समिती सभेमध्ये सतत पाठपुरावा करून निदर्शनात आणून दिला. नागरिकाचा पाणी प्रश्न सोडविला आहे.