बनेंच्या घरात कोण ओढत आहे सिगरेट?
ह. म. बने तु. म. बने मालिका करणार नो स्मोकिंग या विषयावर भाष्य
ह. म. बने तु. म. बने मालिकेत सध्याच्या भागात नो स्मोकिंग या महत्वाच्या विषयावर मालिका भाष्य करणार आहे. वारंवार या विषयावर भाष्य होऊन देखील सिगरेट ओढणे या सवयीला आळा बसत नाही. यंदाच्या ह. म. बने तु. म. बने मालिकेच्या भागामध्ये नो स्मोकिंग या महत्वाच्या विषयाचे धडे गिरवले जाणार आहेत. पार्थला घराच्या गच्चीवर मिळालेल्या सिगरेटच्या पाकिटाबरोबर खेळताना पाहून तुलिका त्याला ओरडते. पण घरात मिळालेल्या पाकीटामुळे ती आश्चर्यचकित होते आणि घरात सिगरेटचे पाकीट आले कुठून याचा विचार सुरु होतो आणि नंतर घरातल्या सर्व पुरुषांवर संशयाची सुई जाते. पण नेमकं बने कुटुंबातील कोण सिगरेट ओढत हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.
पाहायला विसरू नका ह. म. बने तु. म. बने सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता फक्त सोनी मराठी वर.