*थेट संवाद साधणारे पहिलेच महापौर !*

*महापौर साधणार थेट पुणेकरांशी संवाद !*


- फेसबुक लाईव्हद्वारे होणार संवाद
- थेट पुणेकरांशी संवाद साधणारे पहिलेच महापौर
- दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी सायंकाळी ७ वाजता साधणार संवाद


पुणे (प्रतिनिधी)
अलीकडच्या काळात सोशल मीडियाची वाढलेली व्याप्ती आणि त्यात फेसबुकसारखे सर्वच वयोगटात लोकप्रिय असलेल्या माध्यमातून महापौर मुरलीधर मोहोळ थेट पुणेकरांशी संवाद साधणार आहेत. दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता हा थेट संवाद होणार असून याचा पहिला भाग येत्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता महापौर मोहोळ यांच्या फेसबुक पेजवरून होणार आहे.


पहिल्या लाईव्ह संवादापासूनच सामान्य पुणेकरांना यात सहभागी होता येणार असून याद्वारे पुणेकरांना समस्या, सूचना किंवा नवीन कल्पना थेट महापौरांपर्यंत पोहोचवता येणार आहेत.


यासंदर्भात माहिती देताना महापौर मोहोळ म्हणाले, 'पुण्यात सोशल मीडियावर मोठा वर्ग आहे. याचाच योग्य फायदा घेत मी थेट पुणेकरांशी संवाद साधणार आहे. पुणेकरांकडून आलेल्या सूचना, समस्या आणि कल्पना याचा विचार प्राधान्याने करणार आहोत. पुणेकर आपले प्रश्न लाईव्ह सुरू असताना कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतील. पुण्याची भौगोलिक सीमा आणि लोकसंख्या याचा एकंदरीत विचार करता फेसबुक लाईव्हचे माध्यम नागरिकांना सोयीस्कर आणि प्रभावी ठरणार आहे. यात जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न असून नागरिकांनीही व्यापक हिताचे प्रश्न मांडावेत, ही अपेक्षा आहे'.


चौकट
*थेट संवाद साधणारे पहिलेच महापौर !*


सोशल मीडियाचा योग्य वापर करत थेट पुणेकरांशी संवाद साधणारे मोहोळ हे पहिलेच महापौर असून दर महिन्याला पुणेकरांना त्यांच्याशी थेट संवाद करता येणार आहे.