पिंपरी - चिंचवड ची मेट्रो निगडी पर्यंत नेण्याचे स्वप्न आणि पिंं चिं शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार मा.अजितदादा पवार च आहेत,असे म्हटले तर वावगे ठरु नये* .

पुणेरी मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी पर्यंत आली आहे. या मार्गावरील मेट्रोचे काम देखील वेगात सुरु आहे. मात्र, या मेट्रो सेवेपासून शहराचा मोठा भाग वंचित राहत आहे. त्यामुळे पुण्यातील मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत धावायला हवी, अशी मागणी पिंपरी-चिंचवडकरांकडून होत आहे. पुण्यातील मेट्रोचे पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे.


पुणे-पिंपरी चिंचवडचा महाराष्ट्रातील मोठ्या नागरी समूहात समावेश होतो. विविध उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील वाढीमुळे गेल्या दोन दशकात शहरात लोकसंख्या आणि रोजगारामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.                       गेल्या काही दशकात पिंपरी-चिंचवड परिसरात शहरीकरण वेगाने वाढत आहे. 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 17.27 लाख होती. ती 2017 पर्यंत 21 लाख झाली असून 2028 आणि 2038 या वर्षातील लोकसंख्या अनुक्रमे 30.9 लाख आणि 39.1 लाख होण्याचा अंदाज आहे.


पहिल्या कॉरिडॉरमध्ये पीसीएमसी ते स्वारगेट (16.598 किमी) या दरम्यान मेट्रोचे काम सुरु आहे. त्यापैकी पीसीएमसी पासून रेंजहिल पर्यंत डिसेंबर 2019 पर्यंत तर रेंजहिल ते स्वारगेट नोव्हेंबर 2021 पर्यंत कार्यान्वित करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. डिसेंबर 2019 अखेरीस मेट्रोने मेट्रो रुळावर आणली खरी पण, पीसीएमसी ते रेंजहील या मार्गावरील अनेक कामे अजूनही शिल्लक आहेत. पीसीएमसी ते निगडी या मार्गाच्या विस्तारासाठी सर्वसामान्य नागरीक, शहरातील सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच इतर भागधारांकडून मागण्या करण्यात येत आहेत.


महाराष्ट्र मेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यासाठी मंजुरी दिली. त्यानंतर हा अहवाल राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. त्याला फेब्रुवारी 2019 मध्ये राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील मेट्रोचै पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत पोहोचण्याचा आणखी एक मार्ग मोकळा झाला आहे. आता केवळ केंद्र सरकारच्या परवानगीनंतर मेट्रो निगडी पर्यंत धावण्याचे सर्व मार्ग मोकळे होऊन कामाला सुरुवात होणार आहे.


निगडी येथील स्थानिक रहिवासी अ‍ॅड. प्रतिभा जोशी दलाल म्हणाल्या, 'मेट्रो निगडीपर्यंत धावणे आवश्यक आहे. कारण, शहरातील मोठी लोकसंख्या चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, निगडी आणि परिसरात वास्तव्यास आहे. यामुळे निगडी (भक्ती शक्ती चौक) थेट स्वारगेट, मंडई, फडके हौद, शिवाजीनगर, सिविल कोर्ट या भागांशी जोडला जाईल. मेट्रोची पूर्व-पश्चिम मार्गिका जी पीसीएमसी ते स्वारगेट अशी बनविण्यात येत आहे. या विस्तारामुळे पुणे पिंपरी चिंचवड महानगरच्या पश्चिमेकडील दाट वस्ती असलेल्या सर्व भागांना जोडण्याचे काम होईल.'


महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, 'पुण्यातील मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी पिंपरी चिंचवडकरांकडून मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात येत आहे. मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास मेट्रो सकारात्मक आहे. महामेट्रोकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. महापालिकेची त्यासाठी मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर, राज्य शासन देखील पिंपरी ते निगडी मार्गावरील मेट्रोसाठी सकारात्मक आहे. केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यास तात्काळ मेट्रो थेट निगडीपर्यंत धावेल.'


पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग - 
# लांबी - 4.413
# स्थानके - तीन (चिंचवड, आकुर्डी, निगडी)
# खर्च - 1 हजार 48.22 कोटी रुपये                               *विशेष महत्त्वाचे म्हणजे स्वागेट ते निगडी या मार्गावरील मेट्रो चा टप्पा निगडी पर्यंत असावा,ही मागणी त्यावेळेचे पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी केली होती.आणि त्यानुसार दादानी काम ही सुरू केले होते.परंतु राज्यात आणि केंद्रात सरकार बदल्यांने ,हे काम निगडी पर्यंत चे होऊ शकले नाही.परंतु मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा मेट्रो चा मार्ग निगडी पर्यंत असावा याकरिता आग्रही होते.कारण पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहराची खरोखरच जाण असणारा म्हण्यापेक्षा पिंपरी - चिंचवड शहराचे शिल्पकार म्हणून दादांन कडेच आज ही पिंपरी - चिंचवडकर पाहतात,यामध्ये तीळमात्र शंका नाही.पिंपरी - चिंचवड शहराच्या विकासाचे खरे शिल्पकार मा.अजितदादा पवार च आहेत,असे म्हटले तर वावगे ठरु नये* .