press note
*भारतीय विद्या भवनमध्ये रंगली 'लावणी मैफल '*
--------------------------------
'भारतीय विद्या भवन','इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आयोजन
पुणे ः
गिटार,माऊथ ऑर्गन आणि इलेक्ट्रॉनिक की बोर्ड च्या माध्यमातून गाजलेल्या लावण्या एकामागोमाग सादर झाल्या, आणि रसिकांनी जोरदार दाद दिली. निमित्त होते
'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ' लावणी मैफल' या कार्यक्रमाचे !
शुक्रवार, ३ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६ वाजता 'भारतीय विद्या भवन'चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.
'हार्मनी 'इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक' प्रस्तुत या कार्यक्रमात गिटार ,माऊथ ऑर्गन ,इलेक्ट्रॉनिक कि -बोर्ड या माध्यमातून मराठी लावण्या सादर करण्यात आल्या.
प्रशांत पै,अमोल जोशी,दीपाली उपाध्ये,कैवल्य खिस्ती,क्रिश चौधरी,संदीप शिंगाडे,कुमार शेलडेकर ,अविनाश कुलकर्णी,उपेंद्र लक्ष्मीश्वर,जयंत जोशी या कार्यक्रमात सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात पिंजरा चित्रपटातील 'आली ठुमकत मान मुरडत हिरव्या रानी ' या लावणीने झाली. नेहमीच राया तुमची घाई नका लाऊ गाठोड बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला ,ज्वानीच्या आगीची मशाल हाती अशा बहारदार लावण्या सादर झाल्या. 'रात अकेली है बुझ गए दीप ' , 'वो चाँद खिला ,वो तारे हसें ये रात अजब मस्तानी है, जिंदगी ख्वाब है ' , 'मी रात टाकली मी कात टाकली ' अशी गीतेही सादर करण्यात आली.मराठी लोकगीते, आणि हिंदी चित्रपट गीते देखील सादर करण्यात आली.
'भारतीय विद्या भवन'चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले, जयंत जोशी यांनी सूत्र संचालन केले.
हा कार्यक्रम विनामूल्य होता. 'भारतीय विद्या भवन' आणि 'इन्फोसिस फाऊंडेशन'च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ९६ वा कार्यक्रम होता.
.............................................