प्रसिद्धीसाठी
बँक ऑफ महाराष्ट्रने कर्जव्याजदर अर्थात एमसीएलआर कमी केले
पुणे, 07 जानेवारी, 2020: देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रणी असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रने विविध कालावधीतील आपले बेंचमार्क व्याजदर अर्थात् एमसीएलआर कमी केले आहेत. दिनांक 07 जानेवारी 2020 पासून लागू असणारे विविध कालावधीतील कर्जाचे व्याजदर अर्थात एमसीएलआर सध्याच्या व्याजदरापेक्षा 45 बीपीएस अंकापर्यन्त कमी केलेले आहेत.
बँकेचा ओव्हरनाईट, एक महिना आणि तीन महिन्याचा व्याजदर 45 बीपीएस अंकाने कमी केले असून हे व्याजदर अनुक्रमे 7.60% (पूर्वीचा 8.05%), 7.70% (पूर्वीचा 8.15%), आणि 7.75% (पूर्वीचा 8.20%) असे आता निश्चित केले आहेत तर सहा महिन्याचा 40 बीपीएस अंकाने कमी झालेला व्याजदर 7.90% (पूर्वीचा 8.30%), आणि एक वर्षासाठी 10 बीपीएस अंकाने कमी झालेला व्याजदर आता 8.25% (पूर्वीचा 8.40%) इतका झालेला आहे.
कर्जव्याजदरांमध्ये घट करण्यामागचे बँकेचे लक्ष आर्थिक वृद्धीला आणि औद्योगिक विकासाला सहकार्य करणे आणि दरांच्या ट्रान्समिशनला निश्चित करणे असे आहे.
बेस (आधार) व्याजदरामध्येदेखील बँकेने 10 बीपीएस अंकांनी घट केलेली असल्याने बँक ऑफ महाराष्ट्रचा बेस व्याजदर आता 9.40% इतका झालेला आहे