[
*भारती विद्यापीठ आय एम ई डी मध्ये 'इमर्जींग ट्रेंड्स इन फायनान्स'विषया वर राष्ट्रीय कार्यशाळा*
पुणे:
भारती अभिमत विद्यापीठाच्या 'इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रूनरशिप डेव्हलमेंट' (आय एम ई डी) मध्ये 'इमर्जींग ट्रेंड्स इन फायनान्स'विषया वर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. आय एम ई डी च्या पौड रस्ता कॅम्पस मध्ये ही कार्यशाळा २२ जानेवारी रोजी झाली.
आयसीआयसीआय बँकेचे विभागीय प्रमुख आनंद धर्माधिकारी , डिग्री 212 कन्सल्टन्सी सर्व्हिसेस चे संस्थापक प्रवीण बुधौलीया, येस बँकेचे उपाध्यक्ष यतीन शहा यांनी मार्गदर्शन केले.
आय एम ई डी चे संचालक डॉ सचिन वेर्णेकर यांनी स्वागत केले.डॉ. सोनाली धर्माधिकारी, डॉ. अनुराधा येसुगडे, डॉ.सुचेता कांची , विद्यार्थी उपस्थित होते.
..............................................