“बक्षीस”या लघुपटाचे प्रकाशन संपन्न.

“बक्षीस”या लघुपटाचा प्रकाशन सोहळा अण्णाभाऊ साठे सभागृह येरवडा यथे नुकताच संपन्न झाला. लेखक व दिग्दर्शक संतोष धर्मा गायकवाड यांचा हा दूसरा लघुपट आहे.पहिला “सल्या”,याच्या यशस्वी प्रदर्शना नंतर बक्षीस हा लघुपट बनविण्यात आला.या चित्रपटाचे विषय सामाजिक भान ठेवून समाजाच्या हितार्थ एक अत्यंत संवेदनशील व वैचारिक पातळी उंचविणारी ही फिल्म आहे.संतोष गायकवाड व टिम यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख ताडीवाला रोडचे नगरसेवक प्रदीपभाऊ गायकवाड,आनंद सवाने,मिलिंद सोनकांबळे,संतोष राजगुरू,तानाजी खरपुडे,सुजीत बलोषी,विनोद काडळे,प्रवीण नाईक नवरे,चित्रपटाचे मुख्य क्रिएटिव्ह हेड विनोद आनंद ननावरे,कुंदन राजाराम साळुंखे.आदी मान्यवर उपस्थित होते.


छायाचित्र :डावीकडून संतोष राजगुरू,तानाजी खरपुडे,मिलिंद सोनकांबळे,    भारती सर,संभाजी खरपुडे,जमसुद्दीन शेख,आनंदभाऊ सवाणे,प्रदीपभाऊ गायकवाड,बाळू हतगळे,गवसणे सर,संतोष गायकवाड,अनिकेत बाराटे,सोहम गायकवाड,हरक भारतीय,प्रवीण वाघमारे,राहुल व्यवहारे,मुकेश येरूणकर,अजय सर,कुंदन राजाराम साळुंखे.