पुणे स्मार्ट सिटीच्या सीईओ रुबल अग्रवाल यांनी घेतला स्मार्ट प्रकल्पांचा आढावा
स्थळभेटी देत स्मार्ट प्रकल्पांना गती देण्यावर सीईओंचा भर
पुणे: कामकाजाची गती वाढविण्यासाठी आणि प्रकल्पांच्या अंमलबजावणीला वेग देण्यासाठी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी स्मार्ट प्लेस मेकिंग, स्मार्ट रस्ते अशा विविध स्मार्ट प्रकल्पांच्या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला. या भेटी दरम्यान औंध-बाणेर प्रभात समितीचे अध्यक्ष नगरसेवक अमोल बालवडकर उपस्थित होते.
पुणे स्मार्ट सिटी व महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व अभियंते यांनी स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांविषयी सीईओ व बालवडकर यांना माहिती दिली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अग्रवाल या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे कामकाजाला गती देणे आणि वेगवान अंमलबजावणी भर देत आहेत.