जय गणेश !
दगडूशेठ गणपती मंदिरात भगवान श्री गणेशाच्या परिवार देवता मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आज शनिवारी सकाळी माघ शुक्ळ प्रतिपदेला प्रारंभ झाला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव गोडसे आणि सौ. शारदाताई गोडसे यांच्या हस्ते धार्मिक विधींना सुरुवात झाली . याप्रसंगी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, विश्वस्त उत्सव प्रमुख हेमंत रासने आदी उपस्थित होते.
श्रींच्या मंदिरात भगवतीदेवी सिद्धी, भगवती देवी बुद्धी,धी गणेशपुत्र लक्ष आणि लाभ, तथा भगवान श्रीनग्न भैरव यांच्या मूर्तीची स्थापना होत आहे. या आनंददायी सोहळ्याला भाविकांची गर्दी होती.