एक पत्रकार समाजा साठी काय काय करू शकतो ,याचे एक उत्तम उदाहरण कालच पहायला मिळाले .अक्कलकोट तालुक्यातील हंजगी गावांमध्ये नुकतीचच एक दुर्दैवी घटना घडून गेली. हंजगी गावातील सौ.श्रीदेवी जगन्नाथ म्हमाणे या महिलेचा रानडुकराच्या हल्ल्यांमध्ये दिनांक 3 डिसेंबर 2019 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला .एखाद्या गरीब कुटुंबांमध्ये अशी दुर्घटना घडली तर त्याची किती दुरोगामी परिणाम होतात हे त्याच कुटुंबाला माहित असते .अशा वेळेस त्या कुटुंबाला त्या संकटातून सावरण्यासाठी त्याच गावातील एक शिक्षक जो दै.पुढारी (सोलापुर )या वर्तमानपत्राची पत्रकारिता करतो तो समोर येतो ,आणि झालेल्या घटनेची माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवितो. शासनाच्या अनेक योजना ह्या सर्वसामान्यांना माहित नसल्यामुळे व या घटनेचे गांभीर्य त्यांना कळत नाही .पण जाणकार पत्रकारांनी या घटनेची संबंध माहिती महसूल अधिकारी आणि वन विभागाचे अधिकारी यांच्याकडे पोहोचविली व संबंधित महिलेची अंत्यविधी थांबवून त्यांनी त्या महिलेचे प्रेत पंचनाम्यासाठी पाठवुन त्याचा रिपोर्ट आणून तो संबंधित कार्यालयाध्ये नेऊन दिला .ही घटना अतिशय गंभीर होती .अत्यविधी थांबवुन उपस्थितांचा रोष पत्कारुन हे काम करणे खुप अवघड काम.सतत अधिकार्यांच्या भेटी व पाठपुरावा करुन या कुटुंबावरला दुखा:चा डोंगर दुर केला .व संमधीत खात्याकडुन 15 लाखाची शासकीय मदत मिळवुन दिली.त्या पत्रकाराचे नाव यंशवंत पाटील (Y B )सर ,तुमच्या कार्याला कोटी सलाम. पंचक्रोशीतला एक नागरीक नात्याने तुमचा आम्हाला अभिमान वाटतो.तुमच्या हातुन असेच काम होवुदे .तुम्हस मिळालेला आदर्श पत्रकार पुरस्कार हा यथायोग्य आहे .
एक पत्रकार समाजा साठी काय काय करू शकतो