जैन वधूवर परिचय संस्थेचा ३३ वा मेळावा संपन्न.

जैन वधूवर परिचय संस्थेच्या वतीने ३३ वा परिचय मेळावा संपन्न झाला.महालक्ष्मी लॉन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सुमारे ३०० इच्छुक मुलामुलींनी सहभाग घेतला.या प्रसंगी १३०० स्थळांची माहिती दर्शविणार्‍या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी जैन वधूवर परिचय संस्थेच्या अध्यक्ष लताबेन शहा,उपाध्यक्ष मुकेश शहा,हरिषभाई शहा(प्रमुख पाहुणे),सेक्रेटरी सुनील शहा,खजिनदार उद्य मेहता,कामेश शहा(एज्युकॉन),मेळावा प्रमुख पंकज शहा,राजीवभाई शहा आदी मान्यवरांच्या बरोबरच वधूवर पिता-माता व नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना अध्यक्ष लताबेन शहा यांनी सध्याच्या काळात सर्वच बाबी बदलत आहेत.अपेक्षा ही वाढत आहे.आपल्याला हवी असणारी वधू अथवा वर याबाबत जास्तच अपेक्षा असतात,व त्या १००% पूर्ण करणारा मिळणे कठीण असते.यासाठी तडजोड आवश्यक असते असे संगितले.राजीव शहा यांनी लग्न हे २ घरे जोडते मात्र त्यासाठी टोकाची भूमिका नसावी असे प्रतिपादन केले. 


 छायाचित्र :दिप प्रज्वलन करताना मान्यवर.