.
(५ जानेवारी १८४३)
#सत्यशोधक_मुक्ता_साळवे
( क्रांतीज्योती सावित्रीमाईंची विद्यर्थीनी )
( सत्यशोधक लहुजी वस्ताद साळवे यांची पुतणी )
यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्म्रुतीस विनम्र अभिवादन
#प्रिय_मुक्ता,
अस्पृश्यांच्या दुःखाची
तू गाइलीस गाथा
वंदन करतो आज तुला मी झुकवून माथा
साऊ- जोतीच्या
शाळेत पाऊल तुझेच गं पहिले
तुझ्यामुळेच आज
आम्हा हे ज्ञानधन दिसले
लहुबाबाचा हात धरुनी तू धडे
गिरविले
सावित्रीने
जोतिबाने बावनकशी रत्न हे घडविले
अस्पृश्यांच्या उद्धाराची गाइलीस गाणी
तुझ्यामुळेच दिसले जगाला
आमच्या डोळ्यांतील पाणी
पेशवाईच्या धाकाला
ना कधीच जुमानले
जुलुमाचे अन् शोषणाचे
जाब विचारले
चाॅकलेट नाकारुन
तू पुस्तक मागितले
इंग्रजांनाही तुझ्यापुढे
झुकावे लागले
रातंदिवस करुन अभ्यास पहिली तू आली
तुझ्या ज्ञानाने इंग्रजी सत्ताही हादरली
गुलटेकडीच्या मैदानातील विटीदांडू उलगडला
तेलशेंदूर पाजून कसा आमचा पूर्वज गाडला
सवाल केलास तू देवाला सांग धर्म कोणता ,
आमचा सांग धर्म कोणता
देवही मुका जाहला
ऐकून अस्पृश्यांच्या व्यथा
झिणझिण्या आणतात
आजही तुझे विचार जहाल
काय झाले असेल तुझे
कसे केले असतील हाल
धर्म चिकित्सा केलीस
सत्य इतिहास मांडून
आज तुला वंदितो
दोन्ही हात जोडून
- मारोती कसाब ,
उदगीर.