शिवस्मारक स्थलांतरण प्रस्ताव, मुंबई*

शिवस्मारक...


शिवस्मारक स्थलांतरण प्रस्ताव, मुंबई*


जय जिजाऊ मित्रांनो...
*मुंबई जवळ अरबी समुद्रात* छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन व भूमी पूजन सुमारे दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हजारो शिवप्रेमी सरदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे तर काही वैधानिक कारणांमुळे नंतर या शिवस्मारकाचे प्रत्यक्ष काम आजपर्यंत सुरू झालेले नाही. याशिवाय काम कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे. आमदार विनायक मेटे ते प्रधानमंत्री वा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा याबाबत समन्वय नाही. शिवस्मारक हा दुर्दैवाने राजकीय मुद्दा झाला आहे असे वाटते.परिणामी शिवप्रेमी जनतेत अस्वस्थता पसरली आहे... असे जाणवले.
++ मित्रांनो, मुळातच मुंबई येथील शिवस्मारक भव्य परंतु ऐतिहासिक सत्यावर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचे असावे ही शासनासह सर्व शिवभक्तांची प्रामाणिक इच्छा होती व आहे. हे शिवस्मारक जगातील सर्व शिवप्रेमी जनतेला प्रेरणादायी असावे, सहजासहजी पाहता यावे, जास्तीत जास्त सहभाग असावा, प्रवेश फी कमीतकमी असावी, जाण्यासाठी कोणताही अडथळा नसावा ईत्यादी अपेक्षा आहेत. या सर्व बाबींवर सविस्तर चर्चा केली होती. त्यामुळे *छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक मुंबई येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या मोठ्या जमीनीवर उभारण्यात येईल असे शासनाने वेळोवेळी जाहीर केले होते.* परंतु दुर्दैवाने अचानक सन २००५-६ दरम्यान हे स्मारक राष्ट्रवादी व काँग्रेस सरकारने जमीनीऐवजी अरबी समुद्रात उभारण्यात येणार असा अकारण निर्णय घेतला होता, असे लक्षात येते. ही चूक अकारण प्रेस्टिज ईश्यू न करता राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी लवकरच मुख्यमंत्री सोबत चर्चा करून सुधारणा करावी ही विनंती..


++ मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. या निमित्ताने माझी आपणास नम्र विनंती आहे की कृपया आपण आपल्या पातळीवर सरकार मधिल मुख्यमंत्री व इतर मंत्री तसेच शिवसेना राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या माध्यमातून अरबी समुद्रात प्रस्तावित असलेले व अजूनही सुरू न झालेले शिवस्मारक अरबी समुद्रात न बांधता मुंबई येथील जमीनीवर उभारण्यासाठी निर्णय घेण्यात यावा, यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती. कृपया विषय समजून घेणे व भावनिक करु नये...


++ मित्रांनो, अरबी समुद्राच्या ऐवजी शिवस्मारक मुंबई येथील जमीनीवर उभारण्यात आले तर काही फायदे असे आहेत..
(१) जमीनीवरील शिवस्मारक निश्चितच कमी वेळात पूर्ण करता येईल. समुद्रात असलेली वीस हेक्टर जमीन मर्यादा असणार नाही. मोठ्या प्रमाणात पन्नास शंभर हेक्टर वर ऊभे करता येईल. समुद्र भरती वा ओहोटी त्रास नाही. मच्छीमार समाजाची गैरसोय होणार नाही. शिवस्मारक पाहण्यासाठी आलेल्या शिवप्रेमी जनतेची लूट होणार नाही. बसने प्रवास करून जाता येईल ..
(२) अंदाजे खर्च समुद्रातील खर्चापेक्षा खूप खूप कमी असेल. ३९-४०% .
(३) जमीनीवरील शिवस्मारक उभारण्यासाठी भारतीय वा मराठी अभियंते, आर्किटेक्ट्स , ठेकेदार, कलाकार, शिल्पकार , डिझायनर ईत्यादी मनुष्य बळ उपयुक्त ठरतील. परदेशी गरज नाही. परदेशी चलन नाही. तसेच जमीनीवर असल्याने भव्य राहिल. मर्यादा नाही.
(४) जमीनीवर उभारण्यात आलेले शिवस्मारक रयतेसाठी रात्रंदिवस उघडे राहू शकते. संशोधक व अभ्यासक जास्त काळ थांबून काम करु शकतात.
(५) जमीनीवर उभारण्यात आलेले शिवस्मारक गंजणे व खराब होणे यापासून वाचवता येईल. परिणामी आयुष्य जास्त राहिल. देखभालीसाठी खूप कमी खर्च अपेक्षित आहे.
(६) जमीनीवरील शिवस्मारक सुरक्षित राहील. दहशतवादाची भिती नाही. म्हणजेच तेथे कमी सुरक्षा रक्षक लागतील. 
(७) जमीनीवरील शिवस्मारक अल्प दरात वा मोफत शिवप्रेमी जनतेला पाहता येईल. समुद्रात जाणें व येणे, यात खूप खर्च होतो. पण शिवप्रेमी संख्या खूप कमी असेल. जमीनीवर संख्या मोठी असते व अडचण नसेल.


++ मित्रांनो , मुंबईत महाराष्ट्र शासनाच्या मालकीच्या मोठ्या प्रमाणात जमीनी आहेत. कृपया आपण सूचवीणे . त्यापैकी काही माहीतीसाठी देत आहे ...
(१) राजभवन मुंबई... पहिले प्राधान्य राजभवन मुंबई येथील जमीनीला देणे. राजभवन इतर ठिकाणी हलविण्यात यावे. 
मंत्रालय मुंबई समोरील सर्व बसके बंगले तोडून तेथे नवीन राजभवन उभारण्यात यावे. विधान भवन, राजभवन व मंत्रालय एकमेकांना भुयारी वा इतर मार्गाने जोडावे. यामुळे वाहतूक व सुरक्षा खर्च वाचेल.
(२) रेस कोर्स मैदान महालक्ष्मी मुंबई.. पूर्ण मैदान.
(३) वडाळा, रे रोड वा डॉक यार्ड येथील मोकळे मैदान व जमीन . शंभर हेक्टर.
(४) केबीसी मधिल साधारण पन्नास हेक्टर सलग जमीन ..
(५) संरक्षण विभाग भारत सरकारच्या जमिनीवर .
++ मित्रांनो , मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी ही मागणी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातलेली आहे. आता महाविकास आघाडी सरकारच्या विविध नेते व मुख्यमंत्री यांच्या पर्यंत ही सूचना पोचवता आली तर कृपया तसदी घेणे. कदाचित आपल्याला काही सूचना वा शंका असल्यास निरसन करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे लक्षात घेणे..


आपला शिवांकीत,
पुरुषोत्तम खेडेकर पुणे .
९४२२०४६९९७&
९८२३६९३२२७ .
Email - pkhedekar.mss@gmail.com


- संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.