पुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल*

*पुढारी, पुण्यनगरी संपादकाविरुद्ध पोस्को अंर्तगत गुन्हा दाखल*
भिवंडी - पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या  बाल अत्याचार  प्रकरणाची बातमी देताना पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव आणि फोटो वृत्तपत्रात प्रसिद्ध  करणाऱ्या दैनिक पुढारी, पुण्यनगरी आदी सात वृत्तपत्राच्या संपादक आणि रिपोर्टर विरुद्ध पोस्को  कलमानुसार गुन्हा दाखल झाल्याने मीडियात एकच खळबळ उडाली आहे.


भोईवाडा पोलीस ठाण्यात एका सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याची बातमी देताना दैनिक पुढारी, पुण्यनगरी, दोपहर का सामना, हिंदी समाचार, नवभारत, राजस्थान पत्रिका, प्रवासी संदेश या वृत्तपत्रानी पीडित सात वर्षाच्या मुलीचे नाव तसेच फोटो प्रसिद्ध करून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाइडलाइन्सचे उल्लंघन केले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी या सातही वृत्तपत्राचे संपादक तसेच संबंधित रिपोर्टर विरुद्ध लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३ ( २) ( ४ ) प्रमाणे गुन्हा दाखल  केला  आहे.
ऐन दर्पण दिनी सात वृत्तपत्राच्या संपादक आणि रिपोर्टर विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने मिडीयात एकच खळबळ उडाली आहे..


यासंदर्भात पोलिसांची प्रसिद्ध झालेली प्रेस नोट अशी... 


गंभीर स्वरूपाच्या गुन्हयातील  पिडीत मयत मुलीचे  नाव व फोटो प्रकाशित केलेले  वृत्तपत्र संपादक व संबंधित कर्मचारी  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल 


भोईवाडा पो.स्टे., गुन्हा.रजि.क्र. 1 ०२/२०२० 


लैंगिक अपराधापासुन बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम २३(२)(४)प्रमाणे. 


फिर्यादी सहा.पोलीस निरीक्षक/तुकाराम गंगाराम जोशी वय ५२ व्यवसाय नोकरी नेम-भोईवाडा पोलीस ठाणे, भिवंडी. 


आरोपी
१) "पुढारी" वर्तमान पत्र
२) "दोपहर का सामना" वर्तमान पत्र 
३)"पुन्यनगरी" वर्तमान पत्र 
४) "हिंदी समाचार" वर्तमान पत्र 
५) “नवभारत" ई न्युज पत्र 
६) राजस्थान पत्रिका वर्तमान पत्र 
७) प्रवासी संदेश वर्तमान पत्र


वरील १ ते ७ वर्तमानपत्राचे संपादक व तसेच संबधित कर्मचारी 


घटना ता.वेळ, ठिकाण दिनांक २३/१२/२०१९ व दिनांक २८/१२/२०१९ रोजीचे वर्तमान पत्र. 
दाखल ता.वेळ दिनांक ०६/०१/२०२० रोजी २०:३२ वा ठाणे दैनंदिनी क.३१ 
हकिकत : ता.म.वेळी व जागी यातील दिनांक २२/१२/२०१९ 
भोईवाडा पोलीस ठाणे येथे गु.रजि.नं. ४०१/२०१९ 
भादवि  ३६४,३७६, ३७६(एबी), ३७६ (डीबी),३०२ सह पोक्सो क ४,८,९(ह),१०,१२ प्रमाणे दाखल 
*गंभीर स्वरूपाच्या गुन्हयातील 
पिडीत मयत मुलगी वय ०७ वर्षे हिचे* 


१) “पुढारी" वर्तमान पत्र यांनी दिनांक २३/१२/२०१९ रोजी सदर पिडीत मयत मलीचे नाव तसेच फोटो प्रकाशीत केले आहे.
२) "दोपहर का सामना" या वर्तमान पत्रांनी दिनांक २३/१२/२०१९ रोजी पिडीत मयत मुलीचे नाव छापलेले आहे. 
३) “पुन्यनगरी" या वर्तमान पत्रांनी दिनांक २३/१२/२०१९ रोजी पिडीत मयत मुलीचे नाव छापलेले आहे. 
४) "हिंदी समाचार" या वर्तमान पत्रांनी दिनांक २३/१२/२०१९ रोजी पिडीत मयत मुलीचे नाव छापलेले आहे 
५) "नवभारत" या ई न्युज पत्रांनी दिनांक २८/१२/२०१९ रोजी पिडीत मयत मुलीचे नाव छापलेले आहे. 
६) " राजस्थान पत्रिका" या वर्तमान पत्रांनी दिनांक २३/१२/२०१९ रोजी पिडीत मयत मुलीचे नाव छापलेले आहे 
७) "प्रवासी संदेश" या वर्तमान पत्रांनी दिनांक २३/१२/२०१९ रोजी पिडीत मयत मुलीचे नाव व फोटो छापले आहेत.


म्हणुन सदर वर्तमान पत्र यांचे संपादक तसेच संबंधीत कर्मचारी यांचे विरूध्द लैगिक अपराधापासुन बालंकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम २३(२)(४) प्रमाणे कायदेशीर तकार आहे.