*तानाजी चित्रपटातील नाभिक समाजाची बदनामी करणारे पात्र वगळण्यासाठी आदोंलन*
तानाजी चित्रपटातील नाभिक समाजाची बदनामी करणारे व चुगलखोर चित्रण दाखवलेले चुलत्या हे पात्र वगळण्याची मागणी अलका टाँकीज चौकात निषेध आंदोलनाद्वारे बारा बलुतेदार समाज विकास संघाच्यावतीने, महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या व सकल नाभिक समाजाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी,शहराध्यक्ष महेश सांगळे, जिल्हा अध्यक्ष् पै निलेश पांडे यांनी केलेले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे स्वाती पोकळे,शिवसेनेतर्फे गजानन पंडित, वंचिततर्फे सैफन गोची, समता परिषदेतर्फे सागर कोल्हे,भिमशाहीतर्फे नितीन गायकवाड यांनी पाठींबा दिला.
याप्रसंगी ५ दिवसात जर हे चित्रण काढले नाही तर भविष्यात उपोषण, व तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिला आघाडीने दिला.
यावेळी बाळासाहेब तावरे,सुमनताई पवार,निलेश चातुर,माधुरी सांगळे,राजेंद्र पंडित, बाळासाहेब कर्वे,हणुमंत ननावरे, विजय तावरे,गौरी जाधव, राजेंद्र दळवी, केशव मोरे,सुरज ढमाले, अनिल सांगळे,विनायक गायकवाड,प्रदीप वाळुंजकर,महादेव वाळुंजकर,राहुल पांडे,नितीन भुजबळ,हेमंत श्रीखंडे,विनायक रणदिवे,निलेश सैंदाणे,प्रशांत सांगळे,विशाल शिंदे,गणेश शेडगे,भारत मोरे,अशोक सपकाळ,कैलास गायकवाड,मोहन क्षीरसागर,प्रकाश जाधव, सचिन गायकवाड,स्वप्निल सांगळे,विनायक रणदिवे,शाम राऊत आदी अनेक जण याउपस्थित होते.