आंतरशालेय राष्ट्रीय संगणकज्ञान स्पर्धेचे पारितोषिक वितरण*

press release


*आंतरशालेय राष्ट्रीय संगणकज्ञान स्पर्धेचे पारितोषिक वितरण*


पुणे:


महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पी ए इनामदार इन्स्टिट्यूट ऑफ कम्म्युनिकेशन टेक्नोलॉजी तर्फे घेण्यात आलेल्या  आंतरशालेय राष्ट्रीय संगणक ज्ञान स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी,१२ जानेवारी रोजी सकाळी झाले. राज्याचे माजी उच्च शिक्षण मंत्री अनिस अहमद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे होते. पहिली ते अकरावी मधील ३८ हजार विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले. टायपिंग,कॉम्प्युटर हार्ड वेअर,मोबाईल रिपेरिंग,संगणक जुळणी,फोटोशोप,ड्रोन मेकिंग, रोबोटिक्स हे  स्पर्धेसाठी होते. पारितोषिक वितरण समारंभ आझम कॅम्पस असेम्ब्ली हॉलमध्ये झाला. यावेळी आबेदा इनामदार,मुमताज सय्यद ,ऋषी आचार्य उपस्थित होते. 



................................................