हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त शिवसेना पर्वतीच्या वतीने १०० दिव्यांगांना नीलम गो-हे यांच्या हस्ते साहित्य वाटप,व वीर तानाजी चित्रपट दाखवला.

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना पर्वतीच्या वतीने १०० दिव्यांग विद्यार्थांना व्हील चेयर,व तत्सम वस्तु भेट देण्यात आल्या. लक्ष्मी नारायण थिएटर प्रांगणात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विधानपरिषद ऊपसभापती मा.नीलम गो-हे,अमोल रासकर(विभाग प्रमुख),संजय मोरे(शहर प्रमुख),बाळासाहेब ओसवाल(उपशहर प्रमुख),पृथ्वीराज सुतार(गटनेते),अशोक हरणावळ(मा.गटनेते),सूरज लोखंडे,किशोर रजपूत आदि मान्यवरांच्या बरोबरच दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.या प्रसंगी बोलतांना मा.नीलम गो-हे यांनी “दिव्यांग व्यक्ति सर्व कामे करू शकतात,समीर घोष सारखे तज्ञ सुद्धा निर्माण होतात,दिव्यांगांनी आत्मविश्वासाने प्रगती करावी,राज्य सरकार दिव्यांगांना ३% आरक्षण असून ही ते मिळत नाही ते मिळवून  देण्याचा विचार करीत आहे."असे संगितले व वीर तानाजी मालुसरे यांच्या सारखे संकटांचा सामना केला पाहिजे असे संगितले.अमोल रासकर व बाळा ओसवाल यांनी शिवसेनेने ८०%समाजसेवा व २० राजकीय अशी शिकवण दिली आहे.म्हणून शिवसैनिक नेहमी सामाजिक कार्यात पुढे असतात असे संगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन किशोर रजपूत यांनी केले.


छायाचित्र :दिव्यांग विद्यार्थ्यास व्हील चेयर प्रदान करताना नीलम गो-हे,अमोल रासकर,बाळा ओसवाल,संजय मोरे,अशोक हरणावळ व अन्य