जानेवारीला दुपारी १२ वाजता रंगणार ग्रॅण्ड प्रीमिअर   मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझच्या उपस्थितीत रंगला शानदार सोहळा

१२ जानेवारीला दुपारी १२ वाजता रंगणार ग्रॅण्ड प्रीमिअर
 


मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझच्या उपस्थितीत रंगला शानदार सोहळा
 


स्टार प्रवाहवर १२ जानेवारीपासून सुरू होतोय नवा सिंगिंग रिऍलिटी शो 'मी होणार सुपरस्टार'. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या गायकांना या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझ  स्पर्धकांना जजेस समोर नॉमिनेट करणार आहेत. १२ जानेवारीला दुपारी १२ वाजल्यापासून हा ग्रँड सोहळा अनुभवता येईल. आदर्श शिंदे, राहूल देशपांडे,  मृणाल कुलकर्णी हा शो जज करत असून पुष्कर श्रोत्री हा शो होस्ट करणार आहे. दिग्गजांचे जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शोधलेलं अफलातून टॅलेण्ट असा सुरेख मेळ या शोच्या निमित्ताने जुळुन आलाय. त्यामुळे १२ जानेवारीचा रविवार प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे. या ग्रॅण्ड प्रीमियरनंतर दर शनिवार आणि रविवारी ९ वाजता 'मी होणार सुपरस्टार' हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल.