जाहिरात बंद करा...!
*#अक्षय_कुमार मावळ्यांचे कपडे घालून, शिंदेशाही पगडीसह 'निरमा वॉशिंग पावडर' ची जाहिरात करत आहे.* मावळे लढाई करून आल्यानंतर फक्त स्वच्छ कपडे धुवायचे असा त्यांचा त्यामागील संदेश आहे. कपडे धुण्याकडे वा निरमा विकण्यापुरते 'मावळे' व त्यांचे कर्तुत्व उरले का...! हा प्रश्न आहे. चित्रपट, कथा, कादंबऱ्या, पुस्तक व जाहिरात माध्यम यांना छत्रपती शिवाजी महाराज हे सॉफ्ट टार्गेट वाटतात. सतत बदनामी, अवहेलना किंवा चुकीची माहिती देणे... हाच सर्रास धंदा सुरू आहे. सर्व प्रथम चुकीचा इतिहास मांडून प्रचंड बदनामी केली, परवा महाराजांना फेकून मारले, आज मावळ्यांनी कपडे धुतले...! ह्या जाणिवपुर्वक वादग्रस्त चुकीच्या ठिणग्या टाकतय कोण...? अन्यथा 'एक दिवस गव्हा सोबत एक दिवस किडे'ही रगडले जातील...'
अरे त्या 'छत्रपती शिवाजी महाराजांनी व मावळ्यांनी' रक्त सांडून स्वराज्याचा इतिहास लिहिलाय...! त्याची जाण ठेवा.
*तात्काळ #जाहिरात_बंद_झाली_पाहिजे.*
- संतोष शिंदे,
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, पुणे.
9850842703