-------------------------- धम्म ज्ञान स्पर्धा परिक्षा १९ जानेवारी २०२० 

दिक्षाभुमी स्मारक समिति व प्रयास सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "बुद्ध आणि त्यांचा धम्म " व " भारतीय संविधान"  या ग्रंथावर स्पर्धा परिक्षा लवकरच नागपूरात... भंते ससाई
--------------------------------
धम्म ज्ञान स्पर्धा परिक्षा १९ जानेवारी २०२० 
------------------------------------- 
नागपूर:-दि.११ जाने.(सविता कुलकर्णी):- नागपूरातील दिक्षाभुमी म्हणजे विदर्भातील जग प्रसिद्ध असलेले "अ" दर्जा प्राप्त बौद्ध बांधववांचेच नव्हेतर ईतरही समाजाला एकत्र आणण्याचे प्रेरणा स्थळ आहे. याठिकाणी लाखो लोकांनी  पवित्र दिक्षाभूमीवर प.पू.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली  दिक्षा घेतली गेली. त्याच पावनभूमीवर म्हणजेच दिक्षाभूमी स्मारक समिती व प्रयास  सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" व भारतीय संविधान" या ग्रंथावर आधारित धम्म ज्ञान या स्पर्धेचे आयोजन करण्मात आलेले आहे. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून ह्या स्पर्धा परिक्षेत एकंदरीत १० हजार विद्यार्थी बसणार असून त्यांना फक्त tik mark करायचे आहे. अशी माहिती अशोक कोल्हटकर यांनी पत्रपरिषद मध्ये दिली. ही स्पर्धा १९ जानेवारी २०२० रोजी पवित्र दिक्षाभूमीवर स्तूपाच्या समोरिल पटांगणावर सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत संपन्न होईल. त्यानंतर लगेच १ तासात परिक्षेचे निकाल तज्ञ परिक्षकाच्या चमुद्वारे जाहिर करण्यात येईल. 


       हि स्पर्धा घेण्यामागिल संस्थेचा उद्देश असा आहे की, जास्तीत जास्त विद्यार्थी,युवक व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि त्याचा धम्म व भारतीय संविधान या ग्रंथाचा अभ्यास व्हावा भगवान बुद्ध, डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा. या उद्देश्याने या स्पर्धेचे आयोजन होत असते. त्याचप्रमाणे भारतीय संवधानाने नागरिकांना कुठले मुलभुत हक्क, अधिकार,न्याय व स्वातंत्र दिले आहे याची माहिती व्हावी व संविधाना विषयी जागृती निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश्य आहे.


      स्पर्धेचे स्वरुप:
      -------------------
१) या स्पर्धेत भाग घेण्याकरिता १०/- रु. नाममात्र प्रवेश शुल्क राहणार आहे. 
२) स्पर्धा १०० मार्कांची असून  ५० प्रश्न बुद्ध आणि त्याचा धम्म या विषयावर राहिल.
३)  ५० प्रश्न भारतीय संविधान या विषयावर राहिल.
४) ही स्पर्धा वस्तूनिष्ठ(आँब्जेक्टीव टाईप) स्वरुपाची राहिल. 


      या स्पर्धा परिक्षा  ५० विजेत्या विद्यार्थांना  दीक्षाभूमी 
स्मारक समितीचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुर ई ससाई यांचे हस्ते बक्षीस वितरण करण्यात येईल. स्पर्धा परिक्षेत नुसतेच बौद्ध बांधवच नव्हेतर हिंदू, मुस्लिम, सिख ईसाई अशा सर्व जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून इतकेच नव्हेतर मुकबधिर विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने परिक्षेत सहभागी होणार आहेत. 


       पुरस्काराच्या स्वरुपात रोख रक्कम, प्रशस्तिपत्र, सन्मान चिन्ह देऊन विजेत्याना गौरविण्यात देखिल येणार आहे. यावेळी पत्रपरिषद ला उपस्थित अशोक कोल्हटकर, वीरेंन्द्र, विक्रांत, विनय, रवि इ.होते.