#Pressnote
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षिकांचे अभिवादन*
पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित शाळा आणि महाविद्यालयांमधील शिक्षिका आणि विद्यार्थिनीनी गंज पेठेतील महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे यांच्या मार्गदर्शनाखाली टिळक रस्त्यावरील अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यलय आणि कै. सि. धो. आबनावे कला महाविद्यालय, तसेच कोंढव्यातील जडाबाई दगड विद्यालयामधील शिक्षिका, कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची दहा ठळक वैशिष्ट्ये शिक्षिका विद्या चोकसे यांनी यावेळी सांगितली. पुढील वर्षापासून सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ११११ पणत्या प्रज्वलीत करून महाराष्ट्र विधार्थी सहाय्यक मंडळाच्या वतीने अभिवादन केले जाईल, असे मंडळाचे सचिव डॉ. आबनावे यांनी सांगितले.