आजकाल पत्रकार काय करतात ? पण इमानदार पत्रकार कसे जगतात ,हे कोणी पहात नाही , म्हणून ही कविता... चूक भूल माफ असावी
त्याच्या आधी उठून बघ
त्याच्या नंतर झोपून बघ
त्याने दिली शिकवण समाजाला
त्या संस्काराने वागून बघ,
अन एकदा तरी आयुष्यात
पत्रकार होऊन बघ
किती धावतो ,न्याय तुला देतो, त्याच्या जागी तू राहून बघ
तुमच्यासाठी अहोरात्र झगडतो,
कधी त्याच्या सारखा झगडून बघ
अन एकदा तरी आयुष्यात
पत्रकार बनून बघ
थंडी वाऱ्या पावसां मधी
त्याचा सारखं काम करून बघ,
सकाळ दुपार रात्री बेरात्री
त्याच्या सारखं पळून बघ,
अन एकदा तरी आयुष्यात
पत्रकार बनून बघ
थकत नाही कधी तरी
निवांत त्याला जवळून बघ,
दोन शब्द बोल प्रेमाचे
दुःख त्याच जाणून बघ
अन एकदा तरी आयुष्यात
पत्रकार बनून बघ
तोच तुमचा स्रोत न्यायाचा
कधी त्याला अजमावून बघ
कधी तरी त्याच्यासाठी
मदतीचा हात पुढे करून बघ
अन एकदा तरी आयुष्यात इमानदार पत्रकार बनून बघ
थोडा शब्दात बदल करून ,ही वास्तववादी कविता , केली आहे .
रमेश कांबळे
🙏🙏🙏🙏🙏