'मेघावी' संस्थेच्या 'स्वर सुमन' कार्यक्रमात ठुमरी, दादरा आणि सरोद

'मेघावी' संस्थेच्या 'स्वर सुमन' कार्यक्रमात


ठुमरी, दादरा आणि सरोद वादन


 


मेघावी संस्थेतर्फे आयोजित 'स्वर सुमन' कार्यक्रमात यंदा प्रख्यात शास्त्रीय गायिका ध्रिती चटर्जी यांच्या शास्त्रीय गायनाचा बहारदार कार्यक्रम रविवार दिनांक १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता 'मोरेश्वर सभागृह' सिहंगड रस्ता येथे संपन्न होणार आहे. मुळच्या कलकत्त्याच्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या ध्रिती चटर्जी या ठुमरी आणि दादरा सादर करणार आहेत. त्यांना उमेश पुरोहित (हार्मोनियम) आणि अरुप सेन गुप्ता (जर्मनी) (तबला) यांची वाद्य संगत लाभणार आहे.


या कार्यक्रमानंतर प्रख्यात सरोद वादक अनुपम जोशी यांचे सरोद वादन सादर होणार असून अरुप सेन गुप्ता (जर्मनी) हे तबल्याची साथ करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पटवर्धन करणार असून हा कार्यक्रम सर्वांना विनामूल्य आहे. मेघावी संस्थेतर्फे सन २००६ पासून शास्त्रीय गायन आणि वाद्यसंगीत यांच्या प्रसारासाठी वर्षातून सहा विशेष कार्यक्रमांचे रसिकांसाठी मोफत आयोजन केले जाते.