--- पुणे--दि, 18 जानेवारी2020--शिक्षण प्रसारक मंडळी च्या स प महाविद्यालयातील ऑलिम्पिक धर्तीवर नूतनीकरण करण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उदघाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमाळकर यांच्या हस्ते आज शनिवारी सायंकाळी झाले याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष ऍड एस के जैन, सचिव प्रा राधिका इनामदार, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, स्पोर्ट्स कमिटी चे अध्यक्ष केशव वझे, विश्वस्त जयंत किराड, सतीश पवार, दामोदर भंडारी, गजेंद्र पवार, रणजीत नातू, राजेंद्र पटवर्धन,एस पी कॉलेजचे प्राचार्य दिलीप शेठ आदी उपस्थित होते, या जलतरण तलावाचा आकार 50 मिटर लांब, व 12.5 मिटर रुंद असा आहे. या तलावाची फिल्टरेशन प्लॅन्ट अद्यावत करण्यात आला आहे. या तलावाची पाण्याची क्षमता यापूर्वी 15 लाख लिटर्स होती . ती आता कमी करून 8 लाख लिटर्स करण्यात आली आहे. संपूर्ण तलावात निळ्या रंगाचे टाइल्स बसविण्यात आल्या आहेत त्यामुळे पाण्याचा रंग निळसर दिसणार आहे. जलतरण तलावाच्य आवारात विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी साठी पुरुष व महिलांसाठी बाथरूम, शावर्स, चेंजिग रूम्स, स्वतंत्र टॉयलेट स, आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शिक्षण प्रसारक मंडळी च्या विध्यार्थीनीं राज्य स्तरिय ते आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकावे यादृष्टीने या तलावाचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या उपक्रमानतर्गत या जलतरण तलावाचा समावेश व्हावा, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच शी प्र मंडळी च्या इयत्ता 5 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याची विश्वस्त मंडळ ची योजना आहे
titleजलतरण तलावाचे उदघाटन पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमाळकर यांच्या हस्ते