*श्रीवर्धन समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम*
निसर्गाने मनुष्याला भरभरून दिले आणि मनुष्याने निसर्गाला काय दिले?
कचरा? प्लास्टिक? प्रदूषण?
आज आपले महासागर,समुद्रकिनारे हे प्लास्टिकचे उकीरडे झाले आहेत, कित्येक टन प्लास्टीक हे नद्या नाले समुद्रात सोडत आहेत,पर्यटक समुद्रकिनारी प्लास्टीक च्या पिशव्या बिस्लेरी बाॅटल्स टाकतात हे प्लास्टिक समुद्रात जाऊन माशाच्या कित्तेक जाती या नामशेष झाल्या आहे,
लाखो मासे प्लास्टिकमुळे मृत्युमुखी पडताहेत .सागराच्या मध्यभागी काही देशांच्या क्षेत्रफळाएवढे प्लास्टीकचे उकिरडे तयार झाले आहेत.हिच धोक्याची घंटा लक्षात घेऊन चला आपणही निसर्गाचे देणे लागतो ही संकल्पना मनात ठेऊन स्वच्छतेचे व्रत घेऊन *कोकणच्या माणसांचा सखा सोबती असलेला समुद्र व त्याचे किनारे स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा थेरगाव सोशल फाऊंडेशन कडुन एक छोटासा प्रयत्न दिनांक १८ व १९ जानेवारी २०२० रोजी श्रीवर्धन समुद्र किनारी करणार आहोत...*
#TSF
#savethesea#stopplasticpollution
#beach_cleaning
#shrivardhan_beach
Beach Cleaning Event,
🚨 *थेरगाव सोशल फाऊंडेशन* 🚨
स्वच्छता- सुंदरता-जागरुकता